शिवसेना युवा नेते आकाश बाफना यांचा मुस्लिम समाज व शामीरभाई सय्यद मित्र परिवाराच्या वतीने सत्कार
संकटसमयी सर्वसामान्य नागरिक लोकप्रतिनिधींकडे धाव घेतात, मात्र त्यांना थेट मदत करण्याऐवजी या पी.ए.ला भेटा, त्या अधिकाऱ्याला भेटा अशी उत्तरे देत प्रश्नांची टाळाटाळ केली जाते, अशी खोचक टीका माजी नगरसेवक शामीर सय्यद यांनी केली.
शुक्रवार दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता शिवसेना युवा नेते आकाश बाफना यांचा तमाम मुस्लिम समाज व शामीरभाई सय्यद मित्र परिवाराच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना सय्यद म्हणाले की, अनेक लोकप्रतिनिधी स्वतः निर्णय घेण्याऐवजी फक्त फोन करून योजनेत बसवा असे सांगतात. प्रत्यक्षात शासनाच्या योजना सर्वांसाठी आहेत, त्यासाठी लोकांना वारंवार चकरा मारायला लावणे चुकीचे आहे.आकाश बाफना यांनी तात्काळ मदत मिळावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भेट दिली त्यांच्या विशेष प्रयत्नामुळे मदत मिळाली.असे गौरवोद्गार सय्यद यांनी काढले.
दरम्यान, शिवसेनेचे युवा नेते आकाश बाफना यांनी शिवसेना प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जामखेड येथील मुस्लिम समाजातील एका गरजू युवकाला आरोग्य उपचारासाठी दोन लाख रुपयांची मदत मिळवून दिली. या मदतीबद्दल मुस्लिम बांधवांनी बाफना यांचे आभार मानले.
यावेळी जामखेडचे ज्येष्ठ समाजसेवक हाजी डॉ. फारूक शेख, माजी नगरसेवक शामीर भाई सय्यद, रौफ सय्यद, दत्तात्रेय चऱ्हाटे, जावेद फिटर, अली भाई तांबोळी, शौकत भाई सय्यद, करीम भाई सय्यद, अजित बागवान, राजू सय्यद, अजहर शेख, आदिल सय्यद, अरिफ सय्यद, शहबाज सय्यद, इराणी इंतकाब, पप्पू शेख, मोसिन पठाण, हरून सय्यद, आय्यास खान, इरफान पठाण, यासीर सय्यद, अरबाज शेख, आफताब मुन्ना सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट
शिवसेना पक्ष हा जात, धर्म, पंथ या सर्व सीमांच्या पलीकडे जाऊन काम करणारा पक्ष आहे. सामान्य माणसाच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही कधीही कमी पडत नाही. कारण शिवसेनेचा मूलमंत्रच आहे – ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण.राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी कार्यकर्त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून एकही सेकंदाचा विचार न करता तात्काळ मदत दिली, हीच शिवसेनेची कार्यपद्धती आणि संवेदनशीलता दर्शवते.समाजातील प्रत्येक घटकापर्यंत मदत पोहोचवणे, गरजूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आणि माणुसकी जपणे हीच आमची खरी भूमिका आहे. कोणत्याही भेदभावाशिवाय सर्वसामान्य जनतेची सेवा करणे, हेच आमचे ध्येय आहे.