शिवनेरी अकॅडमीमध्ये डॉ. प्रवीण मिसाळ व डॉ. वैशाली मिसाळ यांच्या तर्फे मोफत दंततपासणी शिबीर

0
260
जामखेड प्रतिनिधी 
          जामखेड न्युज – – (सुदाम वराट) 
सप्टेंबर महिन्यात मोठी सैनिक भरती आहे त्यामुळे जामखेड येथिल शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीमध्ये सैन्यात दाखल होऊ इच्छिणाऱ्या तरूणांची सर्व प्रकारची तयारी करून घेतली जात आहे. कॅप्टन लक्ष्मण भोरे व मेजर नागरगोजे हे अकॅडमी मध्ये चांगला सराव करून घेतात विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणी मध्ये अडचण येऊ नये म्हणून डॉ. प्रवीण मिसाळ व डॉ. वैशाली मिसाळ यांच्या मार्फत सर्व मुलांची दंत तपासणी करण्यात आली.
 
      दिनांक 18 रोजी डॉक्टर मिसाळ डेंटल क्लिनिक च्या माध्यमातून डॉ. प्रवीण मिसाळ व सौ डॉ. वैशाली मिसाळ यांनी शिवनेरी अकॅडमी तील 120 विद्यार्थ्यांची मोफत डेंटल तपासणी करून दातांची सफाई व काळजी कशी ठेवावी या विषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले
                     ADVERTISEMENT 
      आर्मी भरती 7 सप्टेंबर ते  24 सप्टेंबर 2021 ला असून विद्यार्थ्यांना मेडिकल साठी समस्या होऊ नये म्हणून डॉ. मिसाळ व त्याच्या सौ. वैशाली मिसाळ प्रत्येक वर्षी ही सेवा अकॅडमीतील विद्यार्थ्यांना देतात जेणेकरून मेडिकल मध्ये सिलेक्ट विद्यार्थ्यांना समस्या येत नाहीत अशी सेवा देणारे डॉ.प्रदीप कुडके डॉ. पांडुरंग सानप हे पण मुलांना नेहमीच कधी पण फ्री चेक अप करतात यामुळे कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी  अॅकॅडमीच्या सर्वाचे आभार मानले व देशभक्त सैनिक घडविण्यात डॉक्टरांचाही मोठा वाटा आहे असे सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here