उद्धव ठाकरे टॉप पाचमध्ये, पहिल्या 11 मध्ये भाजपचे दोन मुख्यमंत्री

0
272
जामखेड न्युज – – – 
 देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या दहांमध्ये भाजपचा फक्त एक मुख्यमंत्री आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पहिल्या पाचमध्ये आहेत. ‘इंडिया टुडे’च्या ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्व्हेत देशातील सर्वाधिक लोकप्रिय 11 मुख्यमंत्र्यांच्या नावांची यादी प्रसारित करण्यात आली आहे. या 11 मुख्यमंत्र्यांमध्ये फक्त भाजपच्या दोन मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.
देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना स्थान मिळाले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराईन विजयन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळाले आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या दोन्ही मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. योगींना या सर्व्हेत फक्त 29 टक्के लोकांची पसंती मिळाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचाही या यादीत समावेस आहे.
हेही वाचा: घरगुती गॅस सिलिंडर महागला; आजपासून मोजावे लागणार इतके रुपये
मोदींच्या लोकप्रियतेत घट -‘इंडिया टुडे’च्या या सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेतही मोठी घट झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत वर्षभरात 66 टक्केंनी घट झाली आहे. जानेवारी 2021 मध्ये 38 टक्के, तर ऑगस्ट 2020 मध्ये 66 टक्के लोकांनी मोदींना पसंती दर्शविली होती. या महिन्यात केवळ 24 टक्के लोकांनी मोदींना पसंती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here