Friday, March 27, 2026
Home ताज्या बातम्या श्री साकेश्वर विद्यालयात डॉ. सुशील तांबे यांच्या ओशन क्रिकेट अकॅडमीच्या शिबीरास मोठ्या...

श्री साकेश्वर विद्यालयात डॉ. सुशील तांबे यांच्या ओशन क्रिकेट अकॅडमीच्या शिबीरास मोठ्या उत्साहात सुरूवात

0
2

जामखेड न्युज—–

श्री साकेश्वर विद्यालयात डॉ. सुशील तांबे यांच्या ओशन क्रिकेट अकॅडमीच्या शिबीरास मोठ्या उत्साहात सुरूवात

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे डॉ सुशील तांबे सर यांच्या ओशन क्रिकेट अकॅडमीच्या शिबिरास मोठ्या उत्साहात सुरूवात झाली यास उस्फुर्त प्रतिसाद दिसून आला.


डॉ सुशिल तांबे सर यांच्या ओशन क्रिकेट अकॅडमी कडून साकत येथील मुलांना क्रिकेट चे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे या करिता उन्हाळी दोन महिन्याच्या प्रशिक्षण शिबिरास सुरुवात करण्यात आली. शिबीराचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक भरत लहाने यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक भरत लहाने, डॉ. सुशील तांबे, राष्ट्रीय पातळीवर खेळलेला खेळाडू शुभम घोडेस्वार, सुदाम वराट, अर्जुन रासकर, त्रिंबक लोळगे, सचिन वराट, मुकुंद वराट, प्रसाद होशिंग, अतुल दळवी यांच्या सह अनेक विद्यार्थी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्याध्यापक भरत लहाने म्हणाले की, विद्यालयात क्रिकेट अकॅडमी सुरू करणे हा विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी, तसेच त्यांच्या क्रीडा कौशल्यांना वाव देण्यासाठी एक उत्तम उपक्रम आहे.

यावेळी बोलताना डॉ. सुशील तांबे म्हणाले की, मुला मुलींनी क्रिकेट चे स्किल शिकून चागला खेळाडू घडावा व त्याच्या हातून देशसेवा घडावी असे सांगितले.

यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!