Tuesday, April 14, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड तालुक्यातील हॉटेल चालकाने गळफास घेत संपवली आपली जीवनयात्रा, तालुक्यात एकच खळबळ

जामखेड तालुक्यातील हॉटेल चालकाने गळफास घेत संपवली आपली जीवनयात्रा, तालुक्यात एकच खळबळ

0
58

जामखेड न्युज—–

जामखेड तालुक्यातील हॉटेल चालकाने गळफास घेत संपवली आपली जीवनयात्रा, तालुक्यात एकच खळबळ

हाॅटेल चालकाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथे घडली. भल्या सकाळी घडलेल्या या घटनेने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

आज २७ रोजी भल्या सकाळी पिंपरखेड येथील हाॅटेल चालक अशोक बाबासाहेब जाधव हे आपल्या हाॅटेलमध्ये गळफास घेतल्याच्या अवस्थेत आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

जाधव यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याच्या बातमीने पिंपरखेड परिसर हादरून गेला. जाधव यांचे पिंपरखेड येथे चायनीज व चहाचे हाॅटेल होते.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जाधव यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलिसांना खिशात चिट्टी सापडली आहे. त्यानुसार पोलीसांचा तपास सुरू आहे.

नेमके कारण काय याचा तपास सुरू आहे. ग्रामस्थ व नातेवाईक यांच्या मते खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली असावी असे सांगितले याचीही चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.

जाधव यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!