साकत ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पिंपळवाडी येथील सुमित शंकर घोलप याची पुणे शहर पोलीस पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्याच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सुमित हा शेतकरी कुटुंबातील असून वडील गुजरात येथे हमालीचे काम करतात. जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरदार सुमितने घवघवीत यश संपादन केले आहे.
सुमित चे प्राथमिक शिक्षण पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळवाडी येथे झाले. माध्यमिक पाचवी ते दहावी पर्यंत श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे शिक्षण झाले. अकरावी बारावी नागेश ज्युनिअर कॉलेज जामखेड येथे शिक्षण झाले यानंतर तो पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होता.
२०१९ साली श्री साकेश्वर विद्यालय साकत येथून दहावी उत्तीर्ण झाला जामखेड येथे अकरावी बारावी केली आणि भरतीसाठी प्रयत्न सुरू केले.
सध्या तो सयाजीराजे अकॅडमी अकलूज येथे पोलीस भरतीची तयारी करत होता. काल जाहीर झालेल्या निकालात सुमीत याने मैदानी चाचणी मध्ये पन्नास पैकी ४५ गुण घेतले तर लेखी परीक्षेसाठी शंभर पैकी ९० गुण मिळविले पुणे शहर पोलीस पदी निवड झाली आहे.
सुमित च्या यशाबद्दल जामखेड पंचायत समितीचे सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, संजय वराट, सरपंच मनिषा सर्जेराव पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, पोलीस पाटील महादेव वराट, श्री साकेश्वर विद्यालयाचा सर्व स्टाफ, पिंपळवाडी येथील अशोक घोलप, दिलीप घोलप, महारुद्र नेमाने, दादासाहेब मोहिते, जालिंदर नेमाने, महादेव घोलप, महादेव नेमाने, आश्रू नेमाने, शिवनाथ घोलप सह अनेक मित्रमंडळी नातेवाईक यांनी अभिनंदन केले आहे.