जामखेड न्युज—–
सागर मोहळकर याच्यावर गोळीबार करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
आरोपीकडुन 01 गावठी कट्टा व 01 जिवंत काडतुस हस्तगत.
जामखेड येथील नुरानी काँलनी परिसरात सहा दिवसांपूर्वी सागर मोहळकर वर गोळीबार करण्यात आला होता. यात तो गंभीर जखमी झालेला होता यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखा जामखेड पोलीस वेगवेगळ्या पद्धतीने तपास करत होते. यानुसार सागर मोहळकर याच्यावर गोळीबार करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात घेत आरोपीकडुन 01 गावठी कट्टा व 01 जिवंत काडतुस हस्तगत केले आहे.

सविस्तर माहिती अशी की, दिनांक 04/ 03/ 2026 रोजी रात्री 07.30 वा. चे सुमारास तपनेश्वर रोड ते खाडेनगर जाणारे रोडवरील नुराणी कॉलनी या ठिकाणी अज्ञात आरोपींनी मोटारसायकलवर येवुन पैलवान सागर किसन मोहळकर याचेवर गावठी कट्टयातुन गोळीबार करुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

सदर घटनेबाबत किसन चांगदेव मोहळकर रा. जांबवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरुध्द जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं. 122/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109(1), सह आर्म ऍ़क्ट 3/25, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
जामखेड या ठिकाणी फायरिंगची वरीलप्रमाणे घटना घडल्यानंतर सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी घटनाठिकाणी भेट देवुन घटनाठिकाणची पाहणी केली. सदर गुन्हा हा पुर्व वैमन्यस्यातुन घडलेला असल्याची शक्यता असल्याने सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेणेबाबत आदेश देण्यात आले.

सदर आदेशानुसार किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांचे नेतृत्वाखाली सपोनि/हरिष भोये, पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार सुरेश माळी, फुरकान शेख, अतुल लोटके, विष्णु भागवत, गणेश लोंढे, शाम जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, योगेश कर्डीले, अमृत आढाव, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, भगवान धुळे यांची दोन पथके तयार करुन सदर पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना करण्यात आले.

पथकाने घटनाठिकाणी पाहणी करुन पथक घटनाठिकाणचे आजुबाजुची व्यवसायीक कौशल्याचे आधारे माहिती काढण्यात आली. तसेच पैलवान सागर मोहळकर याचे यापुर्वीचे पुर्व वैमनस्याबाबत माहिती घेवुन आरोपींची माहिती काढत असतांना सदरचा गुन्हा हा अभिमन्यु पोते रा. जामखेड व त्याचे इतर साथीदारांनी केला असल्याची व तो झिक्री, ता. जामखेड गांवचे शिवारामध्ये असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तात्काळ झिक्री गावचे शिवारात जावुन इसम नामे 1) अभिमन्यु महादेव पोते वय 24 वर्षे, रा. भुतवडा रोड, लाईट बोर्ड शेजारी, जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर यास ताब्यात घेण्यात आले. ताब्यातील इसमाकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने कळविले की, इसम नामे 2) चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, पुर्ण नांव माहित नाही, रा. शास्त्रीनगर, कोथरुड, पुणे(फरार), 3) रोहित विठ्ठल आखाडे रा. शास्त्रीनगर, कोथरुड पुणे(फरार), 4) चिन्या पुर्ण नांव माहित नाही, रा. कोथरुड पुणे(फरार), असे मागील वादाचे कारणावरुन सागर मोहळकर यास जिवे ठार मारण्यासाठी जामखेड या ठिकाणी आले होते.

दिनांक 04/03/2026 रोजी मी पैलवान सागर मोहळकर याचे हालचालीची माहिती वरील इसमांना दिली. त्यानंतर त्यांनी त्यांचेकडील गावठी कट्टयातुन सागर मोहळकर यास जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याचेवर फायरिंग केली असल्याची कबुली दिली आहे.




