Saturday, August 8, 2026
Home ताज्या बातम्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखरजी मुंदडा यांची पुनश्च निवड, तुकाराम अंदुरे व...

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखरजी मुंदडा यांची पुनश्च निवड, तुकाराम अंदुरे व बळीराम मेहेर यांच्याकडून सत्कार

0
2

जामखेड न्युज – – – – – 

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखरजी मुंदडा यांची पुनश्च निवड, तुकाराम अंदुरे व बळीराम मेहेर यांच्याकडून सत्कार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी श्री. शेखरजी मुंदडा यांची पुनश्च निवड केली. त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जामखेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. तुकाराम अंदुरे व नान्नज उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. बळीराम मेहेर यांनी श्री. मुंदडा यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री. शेखरजी मुंदडा यांनी महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची तसेच आयोगाच्या कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय २८ एप्रिल २०२३ रोजी घेण्यात आला. महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम, २०२३ हा २७ एप्रिल २०२३ रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला. राज्यात आयोगाची अंमलबजावणी १० मे २०२३ रोजी झाली, तर आयोगाचे प्रत्यक्ष कार्यान्वयन ७ जुलै २०२३ पासून सुरू झाले. आयोगाचे मुख्यालय पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या इमारतीत, औंध, पुणे येथे आहे.

स्थापनेपासून आयोगाने राज्यातील गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्थांशी समन्वय साधण्याबरोबरच त्यांची नोंदणी व पर्यवेक्षण, गोवंशाचे संरक्षण-संवर्धन व कल्याण, देशी गोवंशाच्या जातींचे संवर्धन, पशू आरोग्य सेवा आणि चारा विकास यांसारख्या बाबींवर विशेष भर दिला आहे. दुर्बल, वयस्क व रोगग्रस्त पशूंच्या देखभालीसाठी आवश्यक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनेही आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत.

अस्तित्वातील कायद्यांचे उल्लंघन करून जप्त करण्यात आलेल्या पशूंची काळजी व व्यवस्थापन सुनिश्चित करणे, शेतकरी व संबंधित घटकांमध्ये पशुव्यवस्थापनाबाबत जनजागृती व प्रशिक्षण करणे, तसेच महाराष्ट्राच्या गोवंश प्रजनन धोरणाची अंमलबजावणी व सनियंत्रण करणे ही आयोगाची महत्त्वाची कार्ये आहेत.

गोशाळांना अधिक स्वावलंबी करण्यासाठी मार्गदर्शन, गोमय व गोमूत्रापासून मूल्यवर्धित उत्पादने, गोआधारित शेती तसेच शासनाच्या विविध योजनांचा प्रसार अशा उपक्रमांनाही आयोगाने चालना दिली आहे. त्यामुळे गोसेवा आणि गोसंवर्धन क्षेत्राला संघटित दिशा देण्यामध्ये महाराष्ट्र गोसेवा आयोगाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे.

यावेळी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य सचिव डॉ. शामकांत पाटील तसेच राहुलजी जगताप उपस्थित होते. उपस्थितांनी श्री. शेखरजी मुंदडा यांच्या पुनर्नियुक्तीचे स्वागत करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!