ल. ना. होशिंग विद्यालयात आचार्य भगवान श्री आनंद ऋषिजी महाराज साहेब यांच्या १२६ व्या जन्मजयंती निमित्त भव्य आनंद चालीसा
आचार्य भगवान श्री आनंद ऋषिजी महाराज साहेब यांच्या १२६व्या जन्मजयंतीनिमित्त जामखेड शाखा क्रमांक १२च्या वतीने विविध धार्मिक व भक्तिमय उपक्रमांचे आयोजन शनिवार दि. ८ ऑगस्ट रोजी भव्य आनंद चालीसा करण्यात आले होते.
‘एक ही गुरु – आनंद गुरु’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गुरु वंदन, गुरुंचे गुणगान, आनंद चालीसाचे सामूहिक पठण तसेच भक्तिमय स्तुती करण्यात आले आनंद गुरुंच्या विचारांचा आणि संस्कारांचा प्रसार व्हावा, तसेच गुरु भक्तांना एकत्रितपणे भक्तीचा अनुभव घेता यावा, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे शरद शिंगवी यांनी सांगितले.
गुरुंच्या गुणगानातून, आनंद चालीसाच्या सामूहिक पठणातून आणि गुरु वंदनातून आपल्या जीवनाला गुरु-कृपेचा आशीर्वाद लाभावा, यासाठी हा कार्यक्रम आहे असे संदिप बोगावत यांनी सांगितले.
आनंद ऋषीजी महाराज हे केवळ संत नव्हते. ते शिक्षण, सेवा आणि माणुसकीचे प्रतीक होते. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात “आनंद वाटा आणि आनंद घ्या” हा संदेश दिला. अडचणीत असणाऱ्यांना मदत करणे, शिक्षणाचा प्रसार करणे आणि समाजाला चांगल्या मार्गावर नेणे हेच त्यांचे ध्येय होते. असे आरती शरद शिंगवी यांनी सांगितले.
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवबापू देशमुख, सचिव अरुणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉ. सुनील कटारिया, खजिनदार शरद देशमुख, माजी सचिव शशिकांत देशमुख तसेच माजी खजिनदार राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष शरद शिंगवी, संदिप बोगावत, आनंद गुगळे तसेच श्रावक संघाच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी प्राचार्य बी. ए. पारखे, उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट, पोपट जगदाळे, मुकूंद राऊत, नरेंद्र डहाळे, राघवेंद्र धनलगडे, विशाल पोले, किशोर कुलकर्णी, रोहित घोडस्वार, उमाकांत कुलकर्णी, बाबासाहेब समुद्र, अदित्य देशमुख, कैलास वराट, विजय क्षीरसागर, हनुमंत वराट, लक्ष्मण सोळंकी, स्वप्निल जाधव, बापू जरे, गणेश नेटके, साई भोसले, लंघे पी. टी, संगिता दराडे, सुप्रिया घायतडक, वंदना अल्हाट, स्वप्नाली घाडगे, पुजा भालेराव, प्रियंका सुपेकर, आर. एस. कारंडे, एस. बी. हंगे, एम. जे. जाधव, एस. डी. जगदाळे, एस. व्ही. भोंडवे, यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.