Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या रखडलेल्या जामखेड-सौताडा रस्त्याच्या कामाबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला ठेकेदाराकडून केराची टोपली दहा...

रखडलेल्या जामखेड-सौताडा रस्त्याच्या कामाबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला ठेकेदाराकडून केराची टोपली दहा दिवसांपूर्वी सूचना देवूनही कामच सुरूच नाही, ट्रॅफिक जाम मुळे वाहनधारक हैराण

0
498

जामखेड न्युज——-

रखडलेल्या जामखेड-सौताडा रस्त्याच्या कामाबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला ठेकेदाराकडून केराची टोपली

दहा दिवसांपूर्वी सूचना देवूनही कामच सुरूच नाही, ट्रॅफिक जाम मुळे वाहनधारक हैराण

दहा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जामखेड तहसील कार्यालयात सबंधित विभागाचे अधिकारी ठेकेदार यांना बोलावत कामाबाबत आढावा घेत. तात्काळ रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या सूचना अधिकारी व ठेकेदार यांना देण्यात आल्या होत्या. जर रस्ता कामात कोणी अडथळा निर्माण करत असेल तर ठेकेदार यांनी पोलिस संरक्षण घेऊन अडथळा निर्माण करण्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या दहा दिवस झाले तरी कामच सरू झालेले नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम ची समस्या निर्माण होत आहे. यामुळे वाहनचालक व जामखेडचे नागरिक वैतागले आहेत.

दहा दिवस झाले तरी रखडलेला रस्ता काम अद्याप सुरू झालेले नाही. यामुळे ट्रॅफिक जाम च्या समस्यांमुळे वाहनधारक व नागरिक हैराण झाले आहेत. एकतर बीड रस्ता रूंदी काही प्रमाणात कमी झाली आहे. अतिक्रमणे निघत नाहीत यामुळे मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

गटाराच्या बाहेर नगरपरिषदेची जागा आहे पाणीपुरवठा पाईपलाईन व शहरातील सांडपाणी गटार व्यवस्था यासाठी पण गटार नालीवर अतिक्रमणे झालेली आहेत. नगरपरिषद कधी व केव्हा हटविणार असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

जिल्हाधिकारी दहा दिवसांपूर्वी आले तेव्हा
तहसीलदार धनंजय बांगर , गटविकास अधिकारी शुभम जाधव, पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी, मुख्याधिकारी अजय साळवे, शशिकांत सुतार सार्वजनिक बांधकाम विभाग, रवींद्र घुले तालुका कृषी अधिकारी, दिलीप तिजोरे सहायक निबंधक जामखेड, महावितरणच्या चव्हाण सहा आदी अधिकारी उपस्थित होते.

अनेक महिन्यांपासून समर्थ हॉस्पीटल ते खर्डा चौक हे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यासाठी ठेकेदार व अधिकारी यांची जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी झाडाझडती घेत हा रस्ता तत्काळ झाला पाहिजे अशा सूचना अधिकारी व ठेकेदार यांना देण्यात आल्या होत्या तरीही रस्ता काम सुरू होत नाही.

जिल्हाधिकारी यांनी रस्त्याबाबत कोण अडथळा निर्माण करत असेल तर त्यांना कायदेशीर कारवाई करा पण रस्त्याबाबत कोणताही निष्काळजी पणा चालणार नाही. त्यामुळे जामखेड सौताडा रस्ता बाबत जिल्हाधिकारी ॲक्शन मोड वर आल्याने जामखेड सौताडा रस्ता लवकर मार्गी लागणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला होता. पण दहा दिवस झाले तरी कामच सरू नाही यामुळे ट्रॅफिक जाम ची समस्या रोजचीच झाली आहे.

चौकट

किती जणांना अपंगत्व आणणार –

गेल्या अनेक महिन्यांपासून खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता हा खोदून ठेवला आहे त्यामुळे जामखेडकर या रस्त्यामुळे मरण यातना भोगत आहेत. त्यामुळे हा रस्ता सुरू झाल्यापासून अनेक जणांना अपंगत्व आले आहे. त्यामुळे हा रस्ता कधी होणार आहे असा सवाल जामखेड कर विचारत आहेत. अधिकारी व ठेकेदार यांना आजुन किती जणांना अपंगत्व आणणार आहेत हे पाहणे अस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!