सीएसआरडीच्या शुभम हंबीररावची राज्यस्तरावर दणदणीत कामगिरी

0
157

जामखेड न्युज——

सीएसआरडीच्या शुभम हंबीररावची राज्यस्तरावर दणदणीत कामगिरी

भारतीय युवा खेल परिषद अंतर्गत महाराष्ट्र राज्य युवा खेल परिषद आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत भा.पां. हिवाळे शिक्षण संस्थेच्या सीएसआरडीचा एमएसडब्ल्यू द्वितीय वर्षाचा विद्यार्थी शुभम सीमा अरुण हंबीरराव याने २०० मीटर व ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले.

याराज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावरसहभाग होता. ही स्पर्धा सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर येथे उत्साहात पार पडली. महाराष्ट्र राज्य युवा खेल परिषदचे संचालक शंकर गायकवाड पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी व पदक प्रदान करण्यात आले.

शुभम हंबीरराव हा अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील हळगाव येथील शेतकरी कुटुंबातील आहे. आई-वडील, आजी-आजोबा, चुलता-चुलती व त्यांची मुले असे एकत्र कुटुंबात राहात कठोरपरिश्रम व सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर शुभमने हे यश मिळवले.

शुभमच्या उज्ज्वल यशाबद्दल सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, सर्व प्राध्यापकवर्ग तसेच बीजेएमसी व एमएसडब्ल्यूचे विद्यार्थी यांनी अभिनंदन करून.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here