बैलगाडा शर्यत पाहत असताना अंगावर बैलगाडा गेल्याने हभप वाकळे महाराजांचा जागीच मृत्यू जामखेड परिसरात शोककळा

0
4314

जामखेड न्युज—–

बैलगाडा शर्यत पाहत असताना अंगावर बैलगाडा गेल्याने हभप वाकळे महाराजांचा जागीच मृत्यू

जामखेड परिसरात शोककळा

जामखेड शहरातील एमआयडीसी मैदान शिवनेरी अकॅडमी समोर काळोबा केसरी बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. यासाठी ह भ प अंकुश भानुदास वाकळे महाराज रा. खांडवी ता.जामखेड (वय ४५) हे बैल घेऊन आलेले होते. बैलगाडा शर्यत सुरू झाल्यावर पाहत असताना वेगाने आलेल्या बैलगाडा ने जोराची धडक दिली यात ते जागीच मृत्यू पावले. या घटनेनंतर तात्काळ दवाखान्यात दाखल केले पण डॉक्टरांनी मृत घोषित केले

पोलीसांनी पंचनामा करून जामखेड येथील रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले सायंकाळी सहा वाजता खांडवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वाकळे महाराज परिसरात किर्तन, प्रवचन, हरीपाठ यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या अकाली जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण इंगळे करत आहेत. 

त्यांच्या मागे वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here