Thursday, March 5, 2026
Home राजकारण जामखेड विकासाचा नवा अध्याय शिवसेनेच्या माध्यमातून सुरू होणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

जामखेड विकासाचा नवा अध्याय शिवसेनेच्या माध्यमातून सुरू होणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जामखेड नगरपरिषद शिवसेनेच्या ताब्यात द्या जामखेड चा चेहरामोहरा बदलणार

0
1639

जामखेड न्युज——-

जामखेड विकासाचा नवा अध्याय शिवसेनेच्या माध्यमातून सुरू होणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जामखेड नगरपरिषद शिवसेनेच्या ताब्यात द्या जामखेड चा चेहरामोहरा बदलणार

जामखेड मध्ये सत्तेची लढाई सुरू आहे. राजकारण मक्तेदारी सुरू आहे. हीच मक्तेदारी मोडीत काढून सामान्य माणसाला विकासाचा केंद्र बिंदू मानुन विकासासाठी परिवर्तन करावयाचे आहे. शिवसेना विकासाची लढाई लढणार आहे. तुम्ही शिवसेनेच्या हातात नगरपरिषद सत्ता द्या तुमचे, रस्ते, पाणीपुरवठा, गटार योजना प्रभावीपणे पुर्ण केल्या जातील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

जामखेड नगरपरिषद निवडणुक शिवसेना उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आज स्वत: एकनाथ शिंदे यांची जामखेड येथे भव्य दिव्य अशी जाहीर सभेने प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य प्रवक्ते डॉ राजू वाघमारे, डॉ. ज्योती वाघमारे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, जिल्हा उपप्रमुख संतोष वाळुंजकर, बापुसाहेब नेटके, युवा नेते आकाश बाफना, तालुका प्रमुख प्रा. कैलास माने, युवा सेना प्रमुख प्रविण बोलभट, कैलास जाधव, नितीन कोल्हे, शिवकुमार डोंगरे, बब्रुवान वाळुंजकर, यांच्या सह अनेक शिवसैनिक हजर होते.

हिंदू मुस्लिम सर्व समाजाचे लोक शिवसेनेच्या प्लॅनल मध्ये एकत्र आले आहेत असा सर्व समावेश पॅनल आहे. प्रस्थापितांच्या विरुद्ध ही लढाई जिंकायची आहे, मी इथे आलो तेव्हा मला अनेक समस्या दिसून आल्या रस्ते नाहीत, सगळीकडे धुळच धुळ हे जिरवा जिरवी मुळे घडत आहे. एकाने निधी आणला तर दुसऱ्याने हाणून पडायचा दोघांच्या भांडणात योजना बंद पडल्या आहेत. इथे जी लढाई सुरू आहे सत्तेची आणि स्वार्थाची, मात्र तुम्हाला विकासाची लढाई करायची आहे. प्रस्थापितांच्या विरोधात ही विकासाची लढाई आहे

लाडकी बहीण योजना बंद करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण कोणीही आला तरी ही योजना बंद पडणार नाही ही योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू झाली, ही बंद पडणार नाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असलो तरी लाडका भाऊ हेच पद मला महत्त्वाचे आहे. नगर विकास खाते एकनाथ शिंदे कडे आहे, शहरात चांगले गार्डन, रस्ते दिल्या शिवाय राहणार नाही. धनुष्यबाणाला निवडून द्या असे आवाहन शिंदे यांनी केले मी मुख्यमंत्री असताना या जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले शिवसेना नेहमी ॲक्शन मोडवर असते, स्पॉट डिसिजन असते Cm म्हणजे कॉमनमॅन Dcm म्हणजे डेडिकेटेल कॉमन मॅन आहे. 

शिवसेनेचे उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पायलताई आकाश बाफना

प्रभाग एक-अ) रेखा मोहन देवकाते

प्रभाग दोन- अ) रेखा कीरण मराळ,
ब) दिनेश रमेश राळेभात

प्रभाग तीन – अ) शिवाजी ज्ञानदेव विटकर

प्रभाग चार- अ) नमशा फईमुद्दीन शेख,
ब) विकी सदाफुले

प्रभाग पाच- अ) विकी संतोष पिंपळे,
ब) वर्षा कैलास माने.

प्रभाग सहा- अ) पुजा अशोक सदाफुले
ब) सोहेल जावेद शेख

प्रभाग सात – अ) दत्तात्रय उर्फ (आण्णा) भिमराव ढवळे

प्रभाग आठ- अ) शितल प्रदिप बोलभट
ब) शामिरभाई लतीफ सय्यद.

प्रभाग नऊ
ब) तारीफ फर्मान शेख.

प्रभाग दहा – अ) जयओम जालिंदर टेकाळे

प्रभाग आकरा – अ) ऋषीकेश कीसन बांबरसे,
ब) शाकुबाई गणेश आजबे

असे उमेदवार आहेत.

चौकट
मी येणार नाही अशा अफवा पसरवल्या होत्या मी कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहणारा नेता आहे. नगर विकास खाते एकनाथ शिंदे कडे आहे, शहरात चांगले गार्डन, रस्ते दिल्या शिवाय राहणार नाही. धनुष्यबाणाला निवडून द्या असे आवाहन शिंदे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!