जामखेडची दुरावस्था दूर करण्यासाठी शिवसेनाच सक्षम – आकाश बाफना मतदान रूपी दिलेला विश्वास वाया जाणार नाही

0
298

जामखेड न्युज ———

जामखेडची दुरावस्था दूर करण्यासाठी शिवसेनाच सक्षम – आकाश बाफना

मतदान रूपी दिलेला विश्वास वाया जाणार नाही,

“जामखेड का सपना आकाश बाफना”

राज्याचे नेतृत्व करणारे दोन दिग्गज असताना जामखेड शहरातील नागरिकांना मोठ्या दुरावस्थेला सामोरे जावे लागत आहे. सर्व समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समस्या सोडविल्या जातील तुम्ही मतदान रूपी दिलेला आशिर्वाद वाया जाणार नाही असे मत युवा नेते आकाश बाफना यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले.

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने रंगत निर्माण केली आहे. सभापती प्रा राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्या समोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. यातच या दुरावस्थेला दोन्ही नेते जबाबदार आहेत. एकमेकांची जीरवाजीरवी करण्यात अनेक कामांना स्थगिती आणत आहेत.

स्वच्छ सुंदर स्वप्नातील जामखेड शिवसेना बनवणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुसज्ज स्वप्नातील जामखेड बनवणारच ते जामखेड ला आले जाहीर सभा घेतली यामुळे चांगली वातावरण निर्मिती झाली आहे. लोकांचा एकनाथ शिंदे यांच्या वर विश्वास आहे. तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आपण शिवसेनेला मतदान करावे असे आवाहन केले.

आज जामखेड शहरातील आरोळेनगर येथे प्रचारफेरी दरम्यान आकाश बाफना बोलत होते. यावेळी मतदारांचा उत्फुर्त प्रतिसाद दिसून आला. मतदान रूपी दिलेला विश्वास जामखेड चा विकास करून सार्थ ठरवू असे मतदारांसमोर सांगितले.

मतदारांच्या प्रतिक्रिया

यावेळी मतदारांमधुन यमुना भागवत यांनी सांगितले की, कोणत्याही पदावर नसताना आकाश बाफना यांनी अनेक भागातील तसेच आमच्या बोराटे वस्तीवर अनेक दिवसांपासून प्रलंबित लाइटची समस्या सोडवली, रस्ता मुरमीकरण केले. निवडणुक नसताना कामे मार्गी लावली. यामुळे सर्व मतदार शिवसेनेबरोबरच राहणार आहेत.

श्रेया देशमुख बोलताना म्हणाल्या की, जामखेड परिसरात अनेक समस्या आहेत. येथील नेते फक्त राजकारण करतात त्यांना समाजाचे काहीही देणेघेणे नाही. समाजकारण करणारे फक्त आकाश बाफना आहेत. आगोदर काम करून आज लोकांसमोर येत आहेत. त्यामुळे त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी “जामखेड का सपना आकाश बाफना” अशा घोषणा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here