उमेदवार कसे हवेत सामान्य की गुन्हेगारी पार्श्वभूमीचे – शशिकांत शिंदे जामखेड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभेत आमदार रोहित पवारांनी विरोधकांची काढली कुंडली

0
701

जामखेड न्युज———

उमेदवार कसे हवेत सामान्य की गुन्हेगारी पार्श्वभूमीचे – शशिकांत शिंदे

जामखेड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभेत आमदार रोहित पवारांनी विरोधकांची काढली कुंडली

जामखेड नगरपरिषद निवडणुकीत तुम्हाला उमेदवार कसे हवेत सर्व सामान्य नागरिकांचे काम करणारे हवेत की दहशत निर्माण करणारे
सध्या भाजपाने योजनेमधून पैसे देऊन मते घेण्याचा नवीन फंडा आणला आहे. फक्त विरोधकांची चौकशी करायची पक्षातील लोक सेफ ठेवायचे असे धोरण सुरू आहे. हि निवडणुक स्वाभीमानाची आहे. तेव्हा मतदारांनी ठरवायचे आहे तुम्हाला उमेदवार कसे हवेत असे जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे सांगितले. 

आज जामखेड नगरपरिषद निवडणुकी संदर्भात महाविकास आघाडीची राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी प्रदेश सचिव सुभानअली शेख, दादाभाऊ कळमकर, खासदार निलेश लंके, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार रोहित पवार, माजी सभापती संजय वराट, विजयसिंह गोलेकर,
सुर्यकांत मोरे, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, मंगेश आजबे, रमेश आजबे, प्रहारचे नय्युम सुभेदार, सुनील कोठारी, गणेश उगले, शिवसेना तालुकाप्रमुख अँड मयूर डोके,
शहाजी राळेभात, सुरेश भोसले, राजुरीचे सरपंच सागर कोल्हे, माजी उपसभापती कैलास वराट, माजी नगराध्यक्ष निखिल घायतडक, बापुसाहेब कार्ले, राजेंद्र पवार, सुधीर राळेभात, विठ्ठल चव्हाण, सुनील उगले, भानुदास बोराटे, प्रशांत राळेभात, महेश राळेभात, जुबेर शेख, अनिल बाबर, सुनील जावळे, वैजनाथ पोले, संतोष पवार, इस्माईल सय्यद, समीर पठाण, बाबासाहेब मगर, अभय शिंगवी, डॉ. कैलास हजारे यांच्या सह अनेक पदाधिकारी व उमेदवार उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, भाजपाने सत्ता लोकशाही ने नाही तर हुकुमशाही ने मिळवली आहे. अन्यायाविरुद्ध लढतो तोच खरा नेता असतो आणि रोहित पवार हेच खरे नेते आहेत.

आमच्या वर कॅमेरे फिरवण्यापेक्षा अवैध धंद्यांवर फिरवा तर बरे होईल असे सांगितले. तुम्हाला सर्व सामान्य लोकांसाठी काम करणारे उमेदवार हवे की, मटके, दारू सावकार हवेत शेतकरी नाराज आहेत.
अन्यायाविरुद्ध क्रांती करण्याचे काम रोहित पवार करतात. म्हणून त्यांना त्रास देण्याचे काम सरकार करत आहे. आज जामखेड मधील विकास कामे थांबलेली आहेत यास सरकारच जबाबदार आहे.

यावेळी बोलताना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपाचे उमेदवार ठेकेदार, मटकापेडी, सावकार अशा लोकांना दिलेली आहे.

आपले उमेदवार सर्व सामान्य आहेत.
निर्भय भयमुक्त वातावरण निर्माण व्हावे त्यासाठी आपले उमेदवार सक्षम आहेत. गेल्या पाच सहा वर्षात कर्जत जामखेड बारामती खालोखाल दिसून येत आहे याचे शिल्पकार रोहित पवार हेच आहेत. यावेळी भाजपाच्या उमेदवारावरिल गुन्हे याचे वाचन सुषमा अंधारे यांनी केले.

यावेळी प्रदेश सचिव सुभानअली शेख म्हणाले की, जामखेड शहरासाठी आमदार रोहित पवार यांनी ५३७ कोटी रुपयांची कामे आणली हेही फक्त अडिच वर्षात या आगोदर भाजप आमदार काय करत होते. काँग्रेस चा उमेदवार डाँन आहे. ती भाजपाची बी टिम आहे. विधानसभेत भाजपाचे काम करणाऱ्यांना काँग्रेस ने उमेदवारी दिली. महाराष्ट्रात मराठा हितासाठी मुस्लिम काम करतो

यावेळी आमदार रोहित पवार यांनी उमेदवारांची ओळख करून दिली. तसेच विरोधी भाजपा उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची कुंडलीच काढली, काही सावकार, जागा बळकावणारे, जमिनीचा ताबा घेणारे, मटका, यातील आहेत. तेव्हा मतदारांनीच ठरवावे तुम्हाला काय हवे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.

नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संध्या राळेभात,
१)आरती राळेभात, संजय डोके
२) संदीप गायकवाड, प्रीती राळेभात
३) आकाश पिंपळे, पर्वती माकुडे
४) सागर सदाफुले, अमृता लोहकरे
५) पुजा गडकर, जयश्री डुचे
६) प्रिती अहिरे, संजय भोसले
७) अनुराधा आडाले, कुंडल राळेभात
८) हिना सय्यद, राजू गोरे
९) नासीर सय्यद, बिभीषण धनवडे
१०) कुरेशी, वसिम सय्यद
११) हरीभाऊ आजबे, अपुर्वा गिरमे
१२) अश्विनी घायतडक, गोकुळ हुलगुंडे

यावेळी खासदार निलेश लंके, रमेश आजबे, प्रा. कैलास हजारे, सुर्यकांत मोरे, वैजनाथ पोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले आभार विजयसिंह गोलेकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here