बिहार निवडणुकीतील भाजपाला मोठ यश, जामखेड भाजपाचा जल्लोष
बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या प्रचंड विजयाचा उत्सव जामखेडमध्ये भाजपाच्या वतीने हा आनंदोत्सव महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या कार्यालयासमोर पेढे वाटून,फटाके फोडून तसेच घोषणा देत शहरात आनंदोत्सव साजरा केला.विजयाच्या पार्श्वभूमीवर जामखेडमध्ये भाजप कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली होती.
यावेळी सभापती पै. शरद कार्ले म्हणाले, बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये २०४ च्या पुढे निवडून आले आहेत.तसेच हा देखील निकाल जामखेड नगर परिषद निवडणुकीत २४ अधिक एक निवडून येईल.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर विश्वास टाकला आहे.येणाऱ्या निवडणुकीत जामखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत बहुमत मिळेल.
यावेळी बोलताना माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर म्हणाले की,आज झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला व भाजपला २०० च्या वरती जागा मिळाले हे मोठं यश आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व जे.पी.नड्डा तसेच अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले.
ॲड.अजय काशिद म्हणाले,विरोधकांकडून मत चोरीचा आरोप होत होता.पंरतु निवडणुकीत लोकांची भरघोस मते नोंदवीत विरोधकांना चपराक दिली.२०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नेतृत्व करत आहेत.त्यांच्यावर संपूर्ण देशवासियांचा विश्वास आहे.हे बिहार च्या निकालावरून सिध्द झाले.
भाजपा ग्रामीण मंडल अध्यक्ष बापूराव ढवळे म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासा हा विजय आहे.देशात काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भाजपाची लहर आहे.असाच विजय जामखेड नगर परिषदेच्या माध्यमातून भाजपा ला घवघवीत यश मिळेल.
भाजपा शहर मंडल अध्यक्ष संजय काशिद म्हणाले की ,आज जामखेड या ठिकाणी प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यालयासमोर बिहार विधानसभा निवडणुकीचा जल्लोष साजरा करत आहोत.महाराष्ट्रात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निश्चित मोठा हातभार लागेल.बिहारमधील निकाल हा जनतेने दिलेला विकासाचा आशिर्वाद असल्याचा दावा केला. यावेळी बाजार समितीचे सभापती पै.शरद कार्ले, माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, ॲड.अजय काशिद, ग्रामीण मंडलाध्यक्ष बापूराव ढवळे, शहरमंडल अध्यक्ष संजय काशिद, शहराध्यक्ष ऋषिकेश मोरे,जेष्ठ नेते प्रवीण चोरडिया,पोपट राळेभात, अर्जुन म्हेत्रे, डॉ गणेश जगताप, केशव वनवे, नगरसेवक दिगंबर चव्हाण, पवन राळेभात, अमित जाधव,माजी संचालक काकासाहेब गर्जे, मोहन चव्हाण, महिला आघाडीच्या लक्ष्मीताई पवार, वैशालीताई शिंदे तसेच गोरख घनवट, चेअरमन सुंदरदास बिरंगळ, पप्पू कात्रजकर, शिवाजी येवले, बाळासाहेब गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.