धुमशान जामखेड नगरपरिषद— नगराध्यक्ष पदासाठी भाजप राष्ट्रवादीत रस्सीखेच, तिसरी आघाडी मैदानात, सर्वच राजकीय पक्षाची स्वबळाची भाषा, आमदार सुरेश धस यांची भूमिका महत्त्वाची ठरणार!!

0
1042
  1. जामखेड न्युज——

धुमशान जामखेड नगरपरिषद—

नगराध्यक्ष पदासाठी भाजप राष्ट्रवादीत रस्सीखेच, तिसरी आघाडी मैदानात, सर्वच राजकीय पक्षाची स्वबळाची भाषा, आमदार सुरेश धस यांची भूमिका महत्त्वाची ठरणार!! 

जामखेड नगरपरिषदेच्या आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी असल्याने व जनतेतून निवड होणार असल्याने प्रमुख राजकीय पक्ष असलेले भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)यांच्यामध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच होत आहे. हे दोन्ही प्रमुख पक्ष महायुती व आघाडीच्या घटक पक्षांना नगराध्यक्ष पदाची जागा सोडणार नसल्याने मित्रपक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे व भावी नगराध्यक्ष म्हणून बॅनरबाजी केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲड.डॉ.अरुण प्रमुख पक्षांना पर्याय म्हणून तिसरी आघाडी करत आहे. तर आम आदमीने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करून आपला इरादा स्पष्ट केला आहे. या सर्व परस्थितीत भाजपमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे. आदर्श फाऊंडेशनचे आकाश बाफना यांनी कोणाच्या तिकीटाची वाट न पाहता सहा महिन्या पासून जिथे कोणी नाही तेथे आदर्श फौंडेशनच्या मदतीने लोकोपयोगी कामे सुरू करून एक प्रकारे उमेदवारी जाहीर केली आहे. आ. सुरेश धस यांचा एक गट स्वतंत्ररीत्या कार्यरत आहे. याबाबत आ.धस यांच्या भुमिकेकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

जामखेड नगरपरिषदेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी होत असल्याने नेते व कार्यकर्ते यांची एक टर्म चुकली आहे. नऊ वर्षांचा काळ वाया गेल्याने कोणीच थांबायला तयार नाही. त्यातच नगरसेवक संख्या तीन ने वाढली व जनतेतून नगराध्यक्ष पद निवडले जाणार असल्याने नगराध्यक्षपद जरी सर्वसाधारण महिला असले तरी अनेक दिग्गज नेते व कार्यकर्ते सौभाग्यवतींना रिंगणात उतरण्याची तयारी करत आहे. त्यादृष्टीने पक्षात लॉबिंग केले जात आहे. नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक राहून नगरसेवकाची जागा पटकाविण्यासाठी काही जण प्रयत्न करत आहे.

जामखेड नगरपरिषदेची सन २०१६मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. सुरेश घस व सात खात्याचे मंत्री प्रा. राम शिंदे व स्थानिक विकास आघाडी असे गट पडले होते. या लढतीत आ. धस यांच्या रणनीतीचा फायदा त्या काळाच्या राष्ट्रवादीला झाला होता एकूण २१ नगरसेवकपैकी राष्ट्रवादीचे १०, भाजपचे ३, शिवसेना ४, मनसे १, अपक्ष ३ अशी समीकरणे झाले होते. व आ. धस यांनी अपक्ष प्रीती विकास राळेभात यांना नगराध्यक्ष पदी बसवून एकहाती सत्ता स्थापन केली होती. तेंव्हापासून ते आजतागायत आ. सुरेश धस यांचा वेगळा चाहता वर्ग आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस मधून ते भाजपमध्ये आल्यावर जामखेड तालुक्याकडे दुर्लक्ष केले होते. २०२४ विधानसभा निवडणुकी साठी भाजपमधून वरीष्ठ पातळीवर त्यांचे नाव चर्चेत होते. व अजूनही त्यांचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे.

युती व आघाडीबाबत संभम
——————————
लोकसभा व विधानसभेत युती व आघाडी झाली होती. नगरपरिषद निवडणुकीत माजी नगरसेवक व इच्छुकांची संख्या मोठी आहे. प्रमुख पक्षात तर इच्छुकांची रांग लागली आहे. त्यामुळे युती व आघाडी धर्म न पाळता पक्ष वाढवण्यासाठी व कार्यकर्ते जपण्यासाठी निवडणूकीत सर्वच राजकीय पक्ष भाषा करत आहे. विधानसभा निवडणुकीत आ. रोहीत पवार सर्वसामान्य नागरिकांबरोबर असणारा थेट संपर्क व झालेले विकासकामे या जोरावर चौथ्या फळीतील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन तीन हजाराचे मताधिक्य शहरातून घेतले होते. शहरातील प्रमुख नेते व कार्यकर्ते यांचे बळ असूनही प्रा. राम शिंदे यांना पिछाडीवर रहावे लागले होते.

मागील झालेल्या नगरपरिषद निवडणूकीतील १७ नगरसेवकांनी पाच वर्षात चार वेळा पक्ष बदलून दलबदलीचा पराक्रम केला आहे. यावेळी तेच माजी नगरसेवक नेत्यांच्या पुढे मागे पळत आहेत. राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या प्रा. मधुकर राळेभात, भाजपमधील अमित चिंतामणी, संजय काशिद, असे प्रमुख चेहरे आपल्या सौभाग्यवती साठी आघाडीवर आहेत.

तर आकाश बाफना यांनी आदर्श फाऊंडेशनच्या माध्यमातून आपला सावता सुभा सुरू केला आहे.  कोणता पक्ष विचार करून संधी देत आहेत याची जामखेडकर वाट बघत आहे यावर सर्वांचे लक्ष आहे

तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्याकडून बिभीषण धनवडे, शहाजी राळेभात, संपत राळेभात, राजेंद्र कोठारी सौभाग्यवती साठी प्रयत्नशील आहेत. तसेच ऐनवेळी आश्चर्याचा धक्का बसणार असा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होऊ शकतो.

शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने हे नगराध्यक्ष व नगरसेवक हे दोन्ही पदे लढविणारे पती-पत्नी या निवडणुकीत दिसणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲड.डॉ.अरुण जाधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महेश निमोणकर उर्वरित समविचारी पक्षांना बरोबर घेऊन तिसरा पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here