जामखेड शहरातील स्वच्छता भगिनींना माजी नगराध्यक्ष अर्चनाताई राळेभात व सोमनाथ राळेभात यांच्या वतीने साडीवाटप
शहराची स्वच्छता ठेवणाऱ्या माता भगिनी प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिवाळी भाऊबीज सणाचे औचित्य साधून माजी नगराध्यक्ष अर्चनाताई राळेभात व भाजपाचे नेते सोमनाथ राळेभात यांच्या वतीने साडीवाटप करण्यात आले. साडी मिळताच एक वेगळाच आनंद कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.
कृतज्ञता व्यक्त करणे शहरातील स्वच्छता राखण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कार्य ओळखून, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
यावेळी रोहिणीताई काशिद, सीमाताई क्षिरसागर, भाजपा मंडल शहराध्यक्ष संजय काशिद, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, ज्येष्ठ नेते प्रविणशेठ चोरडिया, मनोज कुलकर्णी, डॉ. अल्ताफ शेख,अनिल यादव, गणेश मेंढकर, महेश निमोणकर, राऊत मेजर, दिपक सुरसे, अशोक निमोणकर, सोशल मीडिया प्रमुख उद्धव हुलगुंडे विकी ससाणे, विक्रांत घायतडक, उद्धव आजबे, बाळासाहेब काळे, भारत गायकवाडयांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणीताई काशिद व भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आले. माजी नगराध्यक्ष अर्चनाताई राळेभात व सोमनाथ राळेभात यांच्या वतीने साडीवाटप करण्यात आले.
दिवाळी भाऊबीज म्हणून अर्चनाताई राळेभात व सोमनाथ राळेभात यांच्या वतीने साडीवाटप करण्यात आले.