जामखेडमध्ये महिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने रोहिणीताई काशिद व संजय काशिद यांच्या तर्फे स्वच्छता कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
जामखेड मध्ये ऐतिहासिक, धार्मिक व सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या महिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने अध्यक्षा रोहिणीताई काशिद व भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांच्या वतीने नगरपरिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. त्यांना दिवाळी निमित्त मिठाई वाटप करण्यात आली. विविध सामाजिक उपक्रमाद्वारे आपली नगराध्यक्ष पदाची दावेदारी प्रबळ करत आहेत.
यावेळी रोहिणीताई काशिद, सीमाताई क्षिरसागर, भाजपा मंडल शहराध्यक्ष संजय काशिद, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, ज्येष्ठ नेते प्रविणशेठ चोरडिया, मनोज कुलकर्णी, डॉ. अल्ताफ शेख,अनिल यादव, गणेश मेंढकर, महेश निमोणकर, राऊत मेजर, दिपक सुरसे, अशोक निमोणकर, उद्धव हुलगुंडे विकी ससाणे, विक्रांत घायतडक, उद्धव आजबे, बाळासाहेब काळे, भारत गायकवाडयांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने रोहिणीताई काशिद या महिला व मुलींसाठी विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांचे विविध शिबिरे, तलवार बाजी, लाठीकाठी, हळदी कुंकू कार्यक्रम, विधवा महिलांचा सन्मान करणे, दुर्गा वाहन रँली (महिला), रक्तदान शिबीर, विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा सन्मान, महिला आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा, गड किल्ले स्वच्छता मोहीम, वढू बुद्रुक येथे दीपोत्सव, मुलींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी मर्दानी खेळांचे शिबीरे, असे विविध सामाजिक, धार्मिक व ऐतिहासिक उपक्रम वर्षभर राबवितात.
भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद तसेच त्यांच्या पत्नी महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणी काशिद हे दाम्पत्य वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण करतात.
गडकिल्ले स्वच्छता मोहीम, गौरी सजावट स्पर्धा, वेगवेगळ्या शिबिरांच्या माध्यमातून मुलींना आत्मनिर्भर बनवणे, वढू बुद्रुक येथे दीपोत्सव, जिल्ह्यात एकमेव महिला आयोजन शिवजन्मोत्सव साजरा करतात. यासह अनेक सामाजिक व धार्मिक कामाच्या बळावर रोहिणी संजय काशिद या नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार आहेत अशीच चर्चा सध्या महिला भगिनींमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
सभापती प्रा. राम शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशिद व त्यांच्या पत्नी महिला आयोजित शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणी काशिद हे आपल्या जगदंब प्रतिष्ठान मार्फत विविध सामाजिक उपक्रम ते दरवर्षी राबवितात.
सामाजिक, धार्मिक व ऐतिहासिक उपक्रम राबविणाऱ्या रोहिणी संजय काशिद यांना शहरासह वाडी वस्तीवरील महिला व मुलींची नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक पसंती मिळत आहे. त्यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांची काशिद यांचे मनापासून आभार मानले.