सावधान!! महिलेच्या गळ्यातील सोन्याची हिसकावली जामखेड परिसरात भितीचे वातावरण

0
1095

जामखेड न्युज—–

सावधान!! महिलेच्या गळ्यातील सोन्याची हिसकावली

जामखेड परिसरात भितीचे वातावरण

 

दुकानात कपडे खरेदी करून स्कुटीवरून घरी जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या मोटार सायकल वरील अज्ञात चोरट्यांनी गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली व चोरटे पसार झाले. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी पीडित महिला पल्लवी अनिल सानप यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सध्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असल्यामुळे माझी भाची वेदीका अशोक डोंगरे ही आमच्याकडे घरी आली आहे. काल दि. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:१५ वाजताच्या अँक्टीव्हा स्कूटी नं. एमएच १६ डीटी ६५५१ माझी भाची वेदीका अशोक डोंगरे हिच्यासोबत एका कापड दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी आलो होते. कपडे खरेदी करून सायंकाळी ७:१० वाजताच्या सुमारास सदाफुले वस्तीवरील असलेल्या घराकडे जात असताना माझी भाची वेदीका ही स्कुटी चालवत होती व मी पाठीमागे बसलेली असताना सदाफुले वस्ती जवळील टॉवरचे शेजारी मधुकर दळवी यांच्या केश कर्तनालया च्या दुकानासमोर आम्ही आलो असता पाठीमागून शाईन कंपनीच्या मोटारसायकल वरून दोन अज्ञात इसम आले व गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली व पसार झाले.

त्यापैकी एकाचे अंगात काळा शर्ट, चेहरा काळ्या मास्कने झाकलेला व शरीराने सडपातळ, मजबुत तर मागे बसलेला मजबूत असून अंगात पांढरा रंगाचा शर्ट घातलेला असे दोघे शाईन मोटारसायकलवरून आले व त्यांनी माझे गळ्यातील १८ ग्रॅम (५५,००० रुपये ) वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून घेऊन गेले. यावेळी मी व माझी भाची वेदीका हिने त्या चोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्यांच्या ताब्यातील शाईन कंपनीची मोटारसायकल ही भरधाव वेगात चालवून निघून गेले.

यानुसार पल्लवी अनिल सानप (वय २८, रा. सदाफुले वस्ती,ता. जामखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात गंठण चोरांविरुद्ध गु. नं. ०५८०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३९२ नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र सरोदे हे करत आहेत.

दरम्यान घटनेमुळे सदर महिलेसह सदाफुले वस्ती येथील महिला भयभीत झाल्या असून सदाफुले वस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष वसीमभाई सय्यद, उमर कुरेशी, राजेंद्र सदाफुले, नासिर सय्यद, अनिल सानप व पक्ष पदाधिकारी शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांची भेट घेऊन या प्रकरणाचा तत्काळ तपास करावा व आरोपीस अटक करावी अशी मागणी केली तसेच लवकरात लवकर तपास न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

तर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी तपास प्रकरणी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थित शिष्टमंडळाला दिले. सदर महिलेने आपल्या स्कुटीवरून पाठलागही केला, युवक मात्र चोरटे भरधाव वेगाने पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेमुळे सदर महिलेसह सदाफुले वस्तीवरील महिला भयभीत झाल्या असून सदाफुले वस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते व पक्ष पदाधिकारी यांनी शिष्टमंडळासह पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांची भेट घेऊन या प्रकरणाचा तपास करावा तसेच आरोपीस अटक करावी अशी मागणी केली. तसेच लवकरात लवकर तपास न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here