जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावरभटक्या मुक्त आघाडी प्रमुखपदी राम पवार
भारतीय जनता पार्टी जामखेड शहर मंडळ कार्यकारिणीमध्ये राम कंठीलाल पवार यांची “भटक्या मुक्त आघाडी प्रमुख” या महत्त्वपूर्ण पदावर निवड झाली आहे. महाराष्ट्र विधानपरिषद अध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी या निवडीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत शुभेच्छा पत्र दिले आहे.
“आपले नेतृत्वगुण, संघटन कौशल्य आणि समाजातील योगदान ही पक्षासाठी अभिमानाची बाब आहे. पक्षनिष्ठा आणि जनहितासाठी आपण केलेले कार्य निश्चितच फळाला येईल.”
जामखेड तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये या निवडीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी जामखेड नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड संघटनात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते आहे.
राम पवार यांनी शहर व तालुका पातळीवर पक्षसंघटन मजबूत ठेवण्यासाठी, तसेच सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभागासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या निवडीमुळे स्थानिक भाजपला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास पक्षाच्या वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
सभापती प्रा राम शिंदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून राम पवार व लक्ष्मी पवार यांची ओळख आहे. सामाजिक कामात अग्रेसर, दांडगा जनसंपर्क यामुळे जनतेतून राम पवार किंवा लक्ष्मी पवार यांनी उमेदवारी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दिवाळीत प्रभागातील जनतेची दिवाळी गोड व्हावी म्हणून फराळ वाटप हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. याबद्दल जनतेने आभार मानले आहेत व उमेदवारी करण्याची मागणी होत आहे.
प्रभाग पाच हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या प्रभागातील दांडगा जनसंपर्क असणारे राम पवार व त्यांच्या भगिनी लक्ष्मीताई पवार अहोरात्र जनसेवेत असतात. लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सतत तत्पर असतात. जनविकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सतत सामाजिक उपक्रम सुरू असतातयामुळे येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत त्यांची प्रबळ दावेदारी सिद्ध केली आहे.