जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा येथे भर दिवाळीतच ग्रामस्थांचे बेमुदत अमरण उपोषण सुरू
संपूर्ण राज्यात दिवाळीची लगभग सुरू असतानाच आपल्या न्याय हक्कासाठी तसेच शासकीय योजनेत मोठ्या प्रमाणात अफरातफरीमुळे मुलभूत सुविधा पासून ग्रामस्थांना वंचित राहावे लागत आहे. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. गावातील नागरिकांना मुलभूत सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी आज जामखेड तालुक्यातील पिंपळगाव (आळवा) येथे ग्रामपंचायत समोर ग्रामस्थांनी बेमुदत अमरण उपोषण (अन्नत्याग)सुरू केले आहे. यामुळे प्रशासनाची एकच धावपळ उडाली आहे.
केशव बारवकर, श्रीकांत पवार, बोराटे सर, दिनेश बारवकर, विशाल बारवकर, कर्णा बारवकर, शशिकांत बोबडे, संदीप नरके, विनोद बारवकर,टिल्लू भाई शेख, कृष्णा बारवकर हे उपोषणाला बसले आहेत.
आज उपोषण स्थळी ग्रामसेवक व ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज ढेरे यांनी भेट दिली व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. पण उपोषण कर्त्याचे समाधान न झाल्याने उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय उपोषणकर्ते राजु अमृतराव बारवकर यांनी दिला.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवदनामधील मागण्या
१) विशेष ग्रामसभेच्या अधिकारांचे उल्लंघन केलेल्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी….
२) २८ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या ग्रामसभेच्या व्हिडीओ चित्रीकरण पाहुण गावातील रोजगार सहाय्यक निवड करावी.
३) पिंपळगाव (आळवा) ग्रामपंचायत हद्दितील नागरिकांना जिवनावश्यक त्या सेवा सुविधा मिळण्या बाबात.
४) पाणीपुरवठा व स्वच्छता योजना मधिल भष्ट्राचार करणाऱ्यावर कार्यवाही करावी.
५) पायाभुत सुविधा रस्ते, गटार, सिमेंट बाकडे, लाईट इत्यादी कामात भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करुण त्यांचा निधी सरकार जमा व्हावा.
६) पिंपळगांव (आळवा) मधील सरपंच । ग्रामसेवक यांनी वेळोवेळी पदाचा गैरवापर / नियमबाह्य केल्याने त्यांच्यावर कार्यवाही करणेबाबत असे उपोषणकर्ते राजु अमृतराव बारवकर यांनी सांगितले.