जामखेड तालुक्यातील या वस्तीवरील नागरिकांना करावा लागत आहे जीव धोक्यात घालून प्रवास पुल करण्याची ग्रामस्थांची मागणी

0
752

जामखेड न्युज—–

जामखेड तालुक्यातील या वस्तीवरील नागरिकांना करावा लागत आहे जीव धोक्यात घालून प्रवास

पुल करण्याची ग्रामस्थांची मागणी

जामखेड तालुक्यातील दिघोळ परिसरातील ब्राम्हण वाडी, दगडे वस्ती, उमाप वस्तीवरील शेतकरी, महिला, शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. लवकरात लवकर नदीवर पुल व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी जामखेड न्युजशी बोलताना केली आहे.

जामखेड तालुक्यातील दिघोळ जवळून वांजरा नदी वाहते पुढे तीचे नाव मांजरा आहे नंतर हीच नदी गोदावरी नदीला मिळते. नदीच्या एका वाजून दिघोळ व दिघोळ गावातील ब्राम्हण वाडी, दगडे वस्ती, उमाप वस्ती हे दुसऱ्या बाजूला आहे. सुमारे पाचशे लोकवस्ती या ठिकाणी आहे. येथील शेतकरी व शालेय विद्यार्थ्यांना दिघोळ ला ये जा करण्यासाठी एक तर बीड जिल्ह्यातील पांचग्री मार्गी बारा किलोमीटर अंतरावरून ये जा करावी लागते किंवा नदीवर प्लास्टिक पिंपाच्या सहाय्याने केलेल्या तराफावरून शेतकरी, महिला, शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ये जा करावी लागते.

या वर्षी परिसरातील मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे त्यामुळे गावात पाणी आले होते तसेच दोन मृतदेह पण वाहून आले होते. नदीवर पूल नसल्यामुळे ब्राम्हण वाडी, दगडे वस्ती, उमाप वस्ती वरील नागरिकांचे खुपच हाल होतात. दुधवाले शेतकरी शालेय विद्यार्थ्यांना दररोज ये जा करावी लागते यामुळे नदीवर पूल करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दिघोळ येथील हनुमान मंदिर व स्मशानभूमी परिसरात आबासाहेब प्रतिष्ठान मार्फत सुरज व धीरज रसाळ यांनी वृक्षारोपण व पथदिवे बसविले या लोकार्पण कार्यक्रमावेळी नदीवरील धोकादायक प्रवास दिसला.

नदीवर पूल करावा अशी मागणी सभापती प्रा राम शिंदे, आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या कडे करण्यात आली आहे. पुर परिस्थिती पाहण्यासाठी ते आले होते तेव्हा त्यांनी हे वास्तव पाहिजे आहे. तरी लवकर प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

यावेळी केशव (आण्णा) वनवे, संजिवनी पाटील, मनोज राजगुरू, सरपंच सविता संतोष शिंदे, उपसरपंच दशरथ राजगुरू, बाजीराव गोपाळघरे, धीरज रसाळ, सुरज रसाळ, वैजिनाथ गीते, मच्छिंद्र गीते, महालिंग महादेव दगडे, बाळासाहेब दगडे, हनुमान फुने, रमेश दगडे, बालाजी उमाप, सोमिनाथ दगडे, दत्तात्रय गीते उपस्थित होते.

चौकट
पुर परिस्थिती टाळण्यासाठी नदी रूंदीकरण करणे आवश्यक आहे. सध्या नदी पात्र लहान केले गेले आहेत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झालेली आहेत. तेव्हा नियमानुसार जेवढे नदीपात्र आहे तेवढे नदीपात्र रूंदीकरण करणे आवश्यक आहे अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here