दिवाळी निमित्त महिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने वढू बुद्रुक येथे 5100 दिवे लावून संभाजी महाराजांना अभिवादन रोहिणी काशिद यांच्या वतीने एक दिवा राष्ट्रहितासाठी, एक दिवा महिला सुरक्षिततेसाठी
दिवाळी निमित्त महिला शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने वढू बुद्रुक येथे 5100 दिवे लावून संभाजी महाराजांना अभिवादन
रोहिणी काशिद यांच्या वतीने एक दिवा राष्ट्रहितासाठी, एक दिवा महिला सुरक्षिततेसाठी
दीपावळी म्हणजे रांगोळी, रोषणाई, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी. परंतु, आज ज्यांच्या शौर्यामुळे महाराष्ट्रात दीपावळीचा जल्लोष होतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, छत्रपती संभाजी महाराजांसह असंख्य मावळ्यांचे बलिदान यांचा विसर पडत आहे. त्यासाठीच, एक दिवा स्वराज्यसाठी,एक दिवा राष्ट्रहितासाठी, एक दिवा महिला सुरक्षिततेसाठी हा स्तुत्य उपक्रम महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणीताई संजय काशिद यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. यानुसार वढू बुद्रुक येथे 5100 दिवे लावून संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी रोहिणी संजय काशिद सह जामखेड परिसरातील अदिती उबाळे, पूनम हावले, श्रावणी लाड, भारती फरांडे, सृष्टी काळे, आरोही उबाळे, सई काशीद, तुषार सुरसे, साहिल कांबळे, तुषार जगदाळे, तुषार फुलमाळी, ओंकार काशीद, आदित्य साळुंके, रुद्रा काशीद, विलास विटकर, आदित्य साळुंके, माऊली अंदुरे (सरचिटणीस), केशव कोल्हे यांच्या सह अनेक महिला मुली व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“एक दिवा स्वराज्यासाठी” हे एक अभियान किंवा मोहीम आहे, जी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या स्वराज्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची आठवण ठेवण्यासाठी राबवली जाते. या अभियानाचा उद्देश दीपावळी सारख्या सणांच्या निमित्ताने लोकांमध्ये महाराजांच्या विचारांची आणि कर्तृत्वाची जाणीव जागृत करणे आहे असे रोहिणी काशिद यांनी सांगितले.
महिला शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षा रोहिणीताई संजय काशिद यांच्या वतीने दीपावली निमित्त स्वराज्य निर्माता स्वराज्य रक्षकाला 5100 दिवे लावून अभिवादन करण्यात येणार आले. एक दिवा स्वराज्यसाठी एक दिवा महाराष्ट्रातील महापुरुष संस्कृती, परंपरा ऐतिहासिक वारशांसाठी एक दिवा राष्ट्रहितासाठी एक दिवा महिला सुरक्षिततेसाठी असे सांगितले आहे.
छत्रपती संभाजी महाराज समाधी वढू बुद्रुक जि. पुणे येथे बुधवारी दि. 22 रोजी सायंकाळी 7.30 वाजता 5100 दिवे लावून अभिवादन करण्यात येणार आले.
अभियानाचा उद्देश कृतज्ञता व्यक्त करणे: शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी केलेल्या त्यागाची आणि पराक्रमाची आठवण ठेवून कृतज्ञता व्यक्त करणे.
जागरूकता निर्माण करणे: जनतेमध्ये स्वराज्याच्या निर्मितीची आणि त्यामागील संघर्षाची जाणीव निर्माण करणे.
राष्ट्रभक्ती वाढवणे: लोकांना राष्ट्र आणि स्वराज्याबद्दलच्या जबाबदारीची जाणीव करून देणे. दिवाळी निमित्त वढू बुद्रुक येथे 5100 दिवे लावून छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. दरवर्षी हा उपक्रम रोहिणी काशिद यांच्या वतीने चालू ठेवत हिंदू संस्कृती जपण्याचे काम करत आहेत.