Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या अतिवृष्टीमुळे नापीक जमिन व कर्जबाजारीपणाला कंटाळून जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या

अतिवृष्टीमुळे नापीक जमिन व कर्जबाजारीपणाला कंटाळून जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या

0
2367

जामखेड न्युज—–

अतिवृष्टीमुळे नापीक जमिन व कर्जबाजारीपणाला कंटाळून जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या

 

अतिवृष्टीने खरीप पीक पाण्यात, रब्बी पिकांची पेरणी करण्यासाठी शेतात पाणी यामुळे पेरणी करता येत नाही. शासनाची शेतकऱ्यांना दीपावली पुर्वी मिळणारी मदत अद्यापही मिळालेली नाही आता कर्जफेड कशी करायची याच विवंचनेत आरणगाव (पारेवाडी) येथील शेतकऱ्यानी आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जामखेड तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायत हद्दीतील पारेवाडी येथील शेतकरी महादेव कुंडलिक राऊत ( वय ५५) यांनी शेतातील नापिकी शेतात साचलेले पाणी यामुळे अनेक दिवसांपासून नैराश्यात होते यातच त्यांनी आज गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सध्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे. खरीप पीक पुर्णपणे पाण्यात गेले अद्यापही जमिनीत पाणी आहे रब्बी पिकाची पेरणी कधी होणार या विवंचनेत राऊत होते. यामुळे नैराश्यातून आज आत्महत्या केली आहे यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दीपावली ची धामधूम सगळीकडे असताना तसेच शासनाने जाहीर केलेली मदत अद्यापही मिळाललेली नाही. शेतात पाणी यामुळे नैराश्यातून राऊत यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. लवकरात लवकर मदत मिळाली अशी मागणी होत आहे.

अतिवृष्टीमुळे जमीन नापीक झाली पीक पाण्यात असल्याने वाया गेले. आता कर्जफेड कशी करायची याच विवंचनेत राऊत यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येची माहिती मिळताच ग्रामस्थांनी पोलीसांना माहिती दिली. 

घरी दोघेच नवरा बायको राहत होते त्यांना दोन मुले आहेत पण कामानिमित्त ते बाहेरगावी आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड येथे आणण्यात आले होते. यावेळी सरपंच संजय पारे, लहू शिंदे सह अनेक ग्रामस्थ हजर होते. दुपारी दोन वाजता पारेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!