तपनेश्वर शाळेच्या वतीने समाजसेवेची दखल; पायलताई आकाश बाफना यांचा शाल व संविधान प्रत देऊन सत्कार
शहरातील तपनेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात मुरुमीकरणासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदर्श फाउंडेशन चे अध्यक्ष आकाश बाफना व पायलताई बाफना यांनी पुढाकार घेतला. या कार्यतत्पर समाजकार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक व पालकांच्या वतीने बाफना दांपत्यांचा संविधान प्रत आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना पायलताई बाफना म्हणाल्या की,तपनेश्वर शाळा ही शहरातील दुर्लक्षित शाळांपैकी एक असून, पावसाळ्यात चिखलामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
या समस्येची त्वरित दखल घेऊन पती आकाश बाफना यांनी मुरुमीकरणाचे काम हाती घेतले. सामाजिक कार्याचा वसा मला घरातून मिळाला असून सासरे दिलीपजी बाफना यांच्या कार्याचा अभिमान आहे.
विद्यार्थ्यांचे शिक्षण, गुणवत्ता आणि उज्वल भविष्य यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहू. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पायलताईंनी त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले आणि प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी विचारपूस केली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनराज पवार, मुख्याध्यापिका जयश्री पाटील, मंगल सोलंकर, प्रताप पवार, संजय आरेकर, रुपाली कांबळे, शितल कदम, कल्पना मोरे, स्वाती गोरे तसेच अंगणवाडी सेविका शुभांगी अडाले, मदतनीस श्रीमती राजगुरू व पालक सौ.लुकंड भाभी यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.