प्राचार्य बाळासाहेब पारखे राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

0
406

जामखेड न्युज—–

प्राचार्य बाळासाहेब पारखे राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

 

दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ल.ना.होशिंग माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पारखे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले. गेल्या 33 वर्षापासून समाजशास्त्र विभागाचे प्रमुख व विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून अनेक विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केले. त्याचबरोबर प्राचार्य पदाची धुरा सांभाळल्यानंतर अनेक चांगले बदल करत शैक्षणिक, सामाजिक कार्यामध्ये योगदान दिले त्यामुळे अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे.

बी दी चेंज फाउंडेशन राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार 2025 हा दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी देण्यात त्यांना आला.
शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता पूर्व कार्यासाठी व उत्तम योगदानासाठी व समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणाऱ्या कार्याबद्दल हा सन्मान श्री बाळासाहेब पारखे यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देण्यात देण्यात आला.

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासोबत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक व सहशालेय कार्यातील विविध आदर्श उपक्रम त्याचबरोबर या सेवेसाठी असलेली निष्ठा , समर्पण भावना , परिश्रम हे सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कार्य बाळासाहेब आप्पा पारखे यांचे निश्चित आहे. त्यामुळे त्यांना बी दी चेंज फाउंडेशन शिर्डी जिल्हा अहिल्यानगरच्या वतीने पुरस्कार देण्यात आला. गुरुवार दिनांक 16 /10/2025 रोजी विद्यालयाच्या वतीने बाळासाहेब पारखे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.विद्यालयाच्या मानाच्या शिरपेच्यात आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारामुळे मानाचा तुरा रोवला आहे.

बाळासाहेब पारखे यांनी 2009 साली हरिद्वार येथे योग गुरु रामदेव बाबा यांच्या योगपीठात जाऊन योग प्रशिक्षण घेतले तसेच बीड व अहिल्यानगर आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जाऊन विनामूल्य योग शिबिरे घेऊन योग चळवळीच्या कार्यास हातभार लावला आहे.

प्राचार्य पारखे साहेब हे जामखेड तालुका योग समितीचे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.
जामखेड तालुक्यातील मानाचा संविधान महोत्सव 2025 आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार महात्मा फुले शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित ज्योती सावित्री आदर्श शिक्षक पुरस्कार , कै ल रा देशमुख आदर्श शिक्षक पुरस्कार , दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचा आदर्श शिक्षक पुरस्कार ,बीड जिल्हा योग प्रसारासाठी देण्यात येणारा आदर्श योगशिक्षक पुरस्कार , यशवंत प्रतिष्ठान आयोजित बीड येथील मल्हारराव होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित केलेले आहे.

नुकताच शिर्डी येथील राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख,उपाध्यक्ष दिलीप गुगळे,सचिव अरुणशेठ चिंतामणी,सहसेक्रेटरी डॉक्टर सुनील कटारिया,खजिनदार शरद देशमुख ,माजी सचिव शशिकांत देशमुख,माजी खजिनदार राजेश मोरे सर्व संचालक मंडळ आणि उपप्राचार्य युवराज भोसले,उपमुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने,पर्यवेक्षक अनिल देडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्वांनी अभिनंदन केले.
या भव्य सत्कार सोहळ्या प्रसंगी विद्यालयातील ओ एस ईश्वर कोळी भाऊसाहेब,शिक्षिका प्रतिनिधी सुप्रिया घायतडक, गणित विभागाचे प्रमुख भरत लहाने , पोपट जगदाळे,बबन राठोड , कलाशिक्षक मुकुंद राऊत सर , नरेंद्र डहाळे व विद्यालयातील सर्व अध्यापक प्राध्यापक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले आहे . तसेच जामखेड तालुक्यात प्राप्त पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून पारखे साहेब यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here