आदर्श फाउंडेशनचे आदर्श काम शहरासह वाडी वस्तीवर हजारो ब्रास मुरमीकरण

0
322

जामखेड न्युज—–

आदर्श फाउंडेशनचे आदर्श काम

शहरासह वाडी वस्तीवर हजारो ब्रास मुरमीकरण

आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना आणि त्यांच्या सौभाग्यवती पायलताई आकाश बाफना यांच्या पुढाकारातून जामखेड शहरासह भुतवडा, लेहनेवाडी, जांबवाडी, धोत्री, बटेवाडी, चुंबळी, जमादारवाडी सात वाड्यासह वस्तीवर हजारो ब्रास मुरमीकरण करत आदर्श फाऊंडेशनने आदर्श काम केले आहे.

जामखेड शहरासह वाड्या वस्तीवर जाण्यासाठी चिखल तुडवत ये जा करावी लागत होती हीच अडचण ओळखून आदर्श फाउंडेशन च्या माध्यमातून टाकलेल्या मुरमीकरणामुळे विद्यार्थी, नागरिकांना चिखलमुक्त रस्ता मिळाल्याने समाधान व्यक्त करत आदर्श फाउंडेशन चे आकाश बाफना व पायलताई बाफना यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितले आहे.

आदर्श फाउंडेशन च्या माध्यमातून आकाश बाफना व पायलताई बाफना यांचे पदरमोड करत कोट्यवधी रुपयांचे लोकोपयोगी कामे सुरू आहेत. महिलांना मोफत मोहटादेवी दर्शन घडवून आणले सर्व गणपती मंडळाचे सन्मान केले. अनेक ठिकाणी शाळांना मदत केली. निवारा बालगृहात कायमस्वरूपी पक्का निवारा उपलब्ध करून दिला. नादुरुस्त पुलांची दुरूस्ती केली. तसेच शहरासह वाडी वस्तीवर हजारो ब्रास मुरमीकरण केले.

सध्या पदरमोड करून आदर्श फाउंडेशन च्या माध्यमातून कामे सुरू आहेत. जनतेने जर नगराध्यक्ष पदासाठी संधी दिली तर एक आदर्श नगरपरिषद करण्याचा संकल्प बाफना परिवाराचा आहे. तसेच शाळेतील मुलांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून आरो प्लँट प्रत्येक विद्यालयात बसवले जातील असेही बाफना यांनी सांगितले.

यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आम्हाला ये जा करण्यासाठी चिखल तुडवत प्रवास करावा लागत होता. नगरपरिषदेकडे अनेक वेळा मागणी केली पण नगरपरिषदेने लक्ष दिले नाही हीच गोष्ट आकाश बाफना यांच्या लक्षात आली व त्यांनी आम्हाला मुरूम टाकून दिला. आता चांगला रस्ता झाला आहे. बाफना कुटुंबाला खुप खुप धन्यवाद आम्ही त्यांच्या बरोबर आहोत.

समाजासाठी काम करताना फक्त आश्वासन देऊन थांबणे हा आमचा स्वभाव नाही. समस्या दिसली की तिचं समाधान, फक्त आश्वासन नाही, प्रत्यक्ष कृतीतून शोधणं, हाच आमचा प्रयत्न असतो. शहरातील चिखलमय रस्ते लोकांची अडचण ओळखून हजारो ब्रास मुरमीकरण केले आहे.

— आकाश बाफना, अध्यक्ष, आदर्श फाउंडेशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here