प्रभाग 5 मध्ये जनविकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आरोग्य शिबिरात हजारो महिलांची आरोग्य तपासणी प्रभाग पाच साठी राम पवार व लक्ष्मी पवार प्रबळ दावेदार
प्रभाग 5 मध्ये जनविकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आरोग्य शिबिरात हजारो महिलांची आरोग्य तपासणी
प्रभाग पाच साठी राम पवार व लक्ष्मी पवार प्रबळ दावेदार
जनविकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मी पवार व राम पवार यांच्या माध्यमातून प्रभाग 5 मध्ये आरोग्य शिबीर घेण्यात आले यात हजारो महिलांनी लाभ घेतला. तसेच प्रभागात स्वच्छता अभियानासह विविध सामाजिक उपक्रम राबवत नगरसेवक पदासाठी आपली प्रबळ दावेदारी सिद्ध केली आहे.
प्रभाग पाच हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या प्रभागातील दांडगा जनसंपर्क असणारे राम पवार व त्यांच्या भगिनी लक्ष्मी पवार अहोरात्र जनसेवेत असतात. लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सतत तत्पर असतात. जनविकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सतत सामाजिक उपक्रम सुरू असतात.
प्रभागाती गोरगरीब, वंचित महिलांना या आरोग्य शिबीराचा मोठा फायदा झाला. तसेच प्रभागात स्वच्छता अभियान राबविले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमांतर्गत प्रभागात स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविले. व स्वच्छतेविषयी जनजागृती केली.
सभापती प्रा. राम शिंदे यांचे एकनिष्ठ व कट्टर समर्थक म्हणून राम पवार व लक्ष्मी पवार हे ओळखले जातात. सभापती प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून महिला तसेच अदिवासी बांधवाचे अनेक प्रश्न मार्गी लावले त्यांच्या माध्यमातून प्रभागातील अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत.
नगरसेवक पदासाठी आपली प्रबळ दावेदारी सिद्ध केली आहे.