Monday, November 23, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट! चोरी, जुगार, वेश्या व्यवसाय, गांजा विक्रीच्या तक्रारींनी नागरिक...

जामखेडमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट! चोरी, जुगार, वेश्या व्यवसाय, गांजा विक्रीच्या तक्रारींनी नागरिक त्रस्त, पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष! “दादा, कॅसिनो बंद झाला, आता इतर अवैध धंद्यांचाही बंदोबस्त करा!” आमदार रोहित पवार यांना सामान्य जामखेड कराचे खुले पत्र

0
2
जामखेडमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट! चोरी, जुगार, वेश्या व्यवसाय, गांजा विक्रीच्या तक्रारींनी नागरिक त्रस्त, पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष!  “दादा, कॅसिनो बंद झाला, आता इतर अवैध धंद्यांचाही बंदोबस्त करा!” आमदार रोहित पवार यांना सामान्य जामखेड कराचे खुले पत्र

जामखेड न्युज – – – – – – 

जामखेडमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट! चोरी, जुगार, वेश्या व्यवसाय, गांजा विक्रीच्या तक्रारींनी नागरिक त्रस्त,
पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष!

“दादा, कॅसिनो बंद झाला, आता इतर अवैध धंद्यांचाही बंदोबस्त करा!” आमदार रोहित पवार यांना सामान्य जामखेड कराचे खुले पत्र

जामखेड शहरात चोरी, जुगार, मटका, गांजा विक्री, वेश्या व्यवसाय, अवैध सावकारी आणि नियमबाह्य व्यवसायांबाबत नागरिकांकडून तक्रारी होत असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात विविध ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याचा आरोप होत असून, या प्रकारांवर पोलिस प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

जामखेड परिसरातील काही लाॅजवर राजरोसपणे वेश्या व्यवसाय सुरू असतो पोलीस याकडे जाणूनबुजून अर्थपूर्ण दुर्लक्ष करतात या व्यवसायात हाॅटेल चालक गुंड पाळून समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तसेच अवैध दारू विक्री मोठय़ा प्रमाणात सुरू असते. तसेच परिसरातील कलाकेंद्रातही मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य धंदे चालतात.

जामखेडमधील पत्रकारांनी या अवैध धंदे संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले त्यामुळे शहरातील अवैध व्यवसायांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आले आहेत.

कॅसिनो बंद झाला, मग इतर अवैध धंद्यांचे काय?
जामखेडमधील एका सामान्य नागरिकाने आमदार रोहित पवार यांना खुले पत्र लिहून शहरातील अवैध धंद्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. “दादा, कॅसिनो बंद झाला, आता इतर अवैध धंद्यांचाही बंदोबस्त करा,” अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

मटका पेढ्या, जुगाराचे अड्डे, गांजा विक्री, वेश्या व्यवसाय तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई करण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. केवळ एखाद्या ठिकाणी कारवाई करून न थांबता शहरातील अवैध व्यवसायांवर सातत्याने लक्ष ठेवावे, अशीही मागणी होत आहे.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या
१. मटका पेढ्या आणि जुगाराच्या अड्ड्यांवर तातडीने कारवाई करावी.
२. गांजा विक्रीच्या तक्रारींची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी.
३. अवैध सावकारीच्या प्रकरणांची चौकशी करावी.
४. नियमबाह्य कला केंद्रे व इतर बेकायदेशीर व्यवसायांची तपासणी करावी.
५. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी नियमित गस्त व विशेष तपासणी मोहीम राबवावी.

पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे जामखेडकरांचे लक्ष!
शहरात अवैध धंद्यांबाबत तक्रारी आणि आरोप होत असताना पोलिस प्रशासनाने या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थिती तपासावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष तपासणी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणार का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

जामखेड न्यूजचे नागरिकांना आवाहन!
आपल्या परिसरात अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती किंवा तक्रार असल्यास ती योग्य पुराव्यांसह जामखेड न्यूजपर्यंत पोहोचवा. नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम जामखेड न्यूजच्या माध्यमातून केले जाईल. मात्र, कोणावरही पुराव्याशिवाय आरोप न करता प्राप्त माहितीची पडताळणी करूनच ती प्रसिद्ध केली जाईल.
जामखेडला अवैध धंदेमुक्त आणि सुरक्षित शहर बनविण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!