जामखेड महाविद्यालयाची क्रीडा स्पर्धेत दैदीप्यमान कामगिरी
राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्नेहल भोसले हिची निवड
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत बी एम सी सी कॉलेज पुणे येथे पार पडलेल्या आंतर विभागीय स्पर्धेत जामखेड महाविद्यालयाची खेळाडूं स्नेहल भोसले हिने सुवर्ण पदक मिळवून पुणे विद्यापीठाचे नेतृत्व करण्यासाठी विनायक मिशनचे रिसर्च फाऊंडेशन अरियानुर सेलम (चेन्नई ) येथे 23 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ (All India Inter University ) या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागीय आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत जामखेड महाविद्यालयाने चमकदार कामगिरी केली. या मध्ये विविध क्रीडा प्रकार यामध्ये मल्लखांब क्रीडा प्रकारात कु. स्नेहल भोसले हिला सुवर्ण पदक, कुस्ती या क्रीडा प्रकारात ईश्वर 57kg गटात, सौरभ गाडे 92kg गटात, पवन गाडे 86kg गटात,आणि शिवम गर्जे 61kg गटात सुवर्ण पदक तर हृतिक इंगळे 79kg गटात रौप्य पदक आणि रोहित वाघमोडे 77kg गटात कास्य पदक, ग्रीको प्रकारात माऊली कोळेकर 77kg गटात रौप्य पदक मिळवत जामखेड महाविद्यालयाने अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागाची चॅम्पियनशीप मिळवली.
ज्यूदो या क्रीडा प्रकारात राखी भिसे हिने 48kg या गटात व माऊली कोळेकर याने 77kg या गटात रौप्य पदक पटकावले.
बॉक्सिंग या क्रीडा प्रकारात शादाब शेख 85kg गटात व रोहित घुगे 92+kg या गटात सुवर्ण पदक पटकावले आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेत 20 किमी चालणे या क्रीडा प्रकारात गौरव रासणे यांने सुवर्ण पदक मिळविले.
आखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेगवेगळ्या संघात महाविद्यालयाचे खेळाडूं राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करणार आहेत. स्नेहल भोसले चेन्नई येथे होणाऱ्या स्पर्धेत पुणे विद्यापीठाचे नेतृत्व करणार, पै. पवन गाडे चंदीगड विद्यापीठ, पंजाब येथे कुस्ती स्पर्धेत पुणे विद्यापीठाचे नेतृत्व करणार, रोहित घुगे कुरुक्षेत्र विद्यापीठ, हरियाणा येथे होणाऱ्या बॉक्सिंग या स्पर्धेत स.फ.पु पुणे विद्यापीठाचे नेतृत्व करणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जी. पुराणे म्हणाले विद्यार्थ्यांच्या कौशल्य आणि कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयात खेळाडूंना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देत आहोत. पुढे होणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धेचा सराव, मैदानी स्पर्धेचा सराव महाविद्यालयात खेळाडू करत आहेत. सर्व खेळाडूंना महाविद्यालयांचे क्रीडा संचालक डॉ. आण्णा मोहिते मार्गदर्शन करत आहेत. तसेच सर्व विजेता खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष श्री. उद्धव बापू देशमुख, उपाध्यक्ष श्री. दिलीपशेठ गुगळे, सचिव श्री. अरुणशेठ चिंतामणी, खजिनदार श्री. शरदकाका देशमुख, मा. शशिकांत देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनिल जी. पुराणे, उपप्राचार्य डॉ. सुनिल वाय. नरके, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा.डॉ.आण्णा मोहिते व सर्व संचालक मंडळ आणि सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.