राष्ट्रवादी शरद पवार गटाकडुन साकत जिल्हा परिषद गटातून माजी उपसभापती प्रा. कैलास वराट प्रबळ दावेदार
आ. रोहीत (दादा) पवार यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून, साकत जिल्हा परिषद गटातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती प्रा. कैलास वराट हे सध्या प्रबळ दावेदार समजले जात आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती यांच्या मातोश्री कांताबाई देवराव वराट या 2010 ते 2015 असे पाच वर्षे उपसरपंच म्हणून काम केले आहे. यानंतर त्यांचे बंधु प्रा. अरुण देवराव वराट हे 2015 ते 2022 पर्यंन्त साकत विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी निवड झाली होती. कैलास वराट 2010 ते 2015 पर्यंत साकत सोसायटीचे संचालक तसेच 2023 ते आजपर्यंत साकत विविध कार्यकारी सोसायटीवर बिनविरोध चेअरमन म्हणुन पदावर आहेत.
साकत पंचायत समिती गणात 2017 साली माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व स्वर्गीय सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात पाटील यांच्या मार्गदर्शना खाली लढलेल्या निवडणूकीत अल्पशा मताने पराभव झाला. यानंतर कैलास वराट यांनी 2023 रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. आ. रोहीत पवार जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात संचालक सुधीर राळेभात यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली व ती जिंकून कैलास वराट यांची उपसभापती वर्णी लागली होती.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडुन 9 संचालक निवडुन आले तर भाजपचे 9 जण निवडुन आले होते. यावेळी कैलास वराट यांच्यावर पक्षांतर करण्यासाठी भाजप कडुन प्रयत्न केले गेले. मात्र आ. रोहीत पवार व संचालक अमोल राळेभात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस सोबत एकनिष्ठ राहून पक्षाची साथ सोडली नाही.
विधानसभा निवडणुकीत आ. रोहीत पवार यांना विजयी करण्यासाठी संचालक अमोल राळेभात यांच्या खांद्याला खांदा लावून संपुर्ण तालुका पिंजून काढला होता.
विरोधकांनी याचा राग मनात धरुन कैलास वराट यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदावरुन पायउतार व्हावे लागले. तत्पूर्वी त्यांना पक्षांतरासाठी आनेक आमिषे व दबावतंत्र वापरण्यात आले. मात्र त्यांनी आपल्या पदाचा विचार न करता आमदार रोहीत (दादा) पवार व जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्याशी एकनिष्ठ राहिले. या सर्व बाबींचा विचार करता माजी उपसभापती कैलास वराट सर हे राष्ट्रवादी काँग्रेस कडुन साकत जिल्हा परिषद गटाकडुन निवडणुक लढविण्यास प्रबळ दावेदार समजले जात आहेत.