जामखेड न्युज—–
कलाकेंद्र फोडणारी टोळी गावठी कट्ट्यासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त,
अद्याप अकरा आरोपी फरार
जामखेड येथील रेणुका कलाकेंद्रात तोडफ फोड करुन दहशत निर्माण करणाऱ्या टोळीतील सात आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ०१ गावठी कट्टा, ०३ जिवंत काडतुसे आणि स्कॉडा कंपनीची पांढऱ्या रंगाची कार असा एकूण ६ लाख ५३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीमध्ये अक्षय किशोर बोरुडे, शहनवाज अन्वर खान, जयसिंग दादापाटील लोंढे, अविनाश भास्कर शिंदे, गणेश सचिन शिंदे, ऋषिकेश यौसेफ गरुड, सर्व (रा. तिसगांव, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) अनिकेत ऊर्फ बाळा नितिन कदम ( रा. एमआयडीसीरोड, ता. आष्टी, जि. बीड) यांचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती अशी जामखेड शहराच्या लगत असणाऱ्या रेणुका कलाकेंद्रावर एकाच आठवड्यात दोन वेळा तोडफ फोड करत राडा करण्याची घटना घडली होती. खंडणीचा गुन्हा दाखल असतानाही मुख्य आरोपीसहवरील आरोपींनी कलाकेंद्रावरील सात-आठ गाड्यांची तोडफ फोड केली होती.

याशिवाय कलाकेंद्रातील महिलांना बेदम मारहाण देखील केली होती. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात खंडणी, विनयभंग व आर्म अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांची जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेस विशेष कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली होती. गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने तपास करत आरोपी अक्षय किशोर बोरुडे (रा. तिसगाव, पाथर्डी) याला ताब्यात घेतले असता, त्याने आपल्या साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर आणखी सहा आरोपींना अटक करण्यात आली.





