जामखेड न्युज—–
साकत घाटातील खड्डयामुळे ट्रकमधील पीव्हीसी पाईप रस्त्यावर
मागील वाहनचालक थोडक्यात बचावले
जामखेड सौताडा महामार्गाचे गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत संथ गतीने काम सुरू आहे. पुलाचे काम व खराब रस्ता यामुळे वाहने साकत मार्गी ये जा करतात. सध्या साकत रस्ताही खुपच खराब झाला आहे. खड्डेच खड्डे आहेत. घाटातही रस्त्यावर मोठ मोठे खड्डे आहेत. याच खड्यात पाईपने भरलेला ट्रक आदळला व गाडीतील निम्म्याहून अधिक पाईप रस्त्यावर पडले घरगळत खाली आले सुदैवाने मागील गाडीचालक सावध असल्याने धोका टळला.

रस्त्यावर नेमके वरील टर्नवर पाईप चा ढीग रस्त्यावर झाला होता. अर्धा तास वाहतूक बंद होती. याच वेळी या ठिकाणी जामखेड वरून साकतला जाणारे रोहित घोडेस्वार सर, भानुदास पुलवळे, प्रकाश गवळी यांनी पाईप हटविण्यासाठी मदत केली अर्धा तासानंतर पाईप हटविण्यावर वाहतूक सुरळीत सुरू झाली.
आज दुपारी साडेतीन च्या आसपास जामखेड वरून पाईप भरलेला एम एच १६ ए. ई. 5431 क्रमांकाचा ट्रक बीड जिल्ह्यातील केज या ठिकाणी चालला होता. घाटातील खड्डयामुळे गाडीतील पाईप खाली आले आणि रोडवर पाईपच पाईप झाले. काही पाईप घरघळत लाब गेले. सुमारे अर्धा तास वाहतूक बंद होती.
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम खुपच संथ गतीने सुरू आहे. यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये – जा करतात. साकतचा घाट खुपच अरूंद आहे त्यामुळे वळणाचा नीट अंदाज येत नाही यातून नेहमीच अपघात होतात. आता तर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताची संख्या वाढली आहे.

सध्या जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग चे काम खुपच संथगती ने सुरू आहे. यामुळे अनेक वाहने साकत मार्गी ये जा करतात पण सौताडा घाटापेक्षा साकत घाट कठीण व अरूंद आहे यामुळे चालकाला अंदाज येत नाही यामुळे अपघात होतात. घाट रूंदीकरण करण्याची व खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.









