जामखेड शहरातील नशाबहाद्दर व रोडरोमिओंचा बंदोबस्त करा – बापूसाहेब गायकवाड
शहरातील तपनेश्वर, विंचरणा नदीकाठचा रस्ता या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक सतत ये जा करतात तेव्हा नशाबहाद्दर व रोडरोमिओंचा त्रास विद्यार्थी व नागरिकांना होतो त्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा भीमटोला संघटनेच्या वतीने बापूसाहेब गायकवाड यांनी दिला आहे.
शहरातील तपनेश्वर येथील अमरधाम रोड ते भुतवडा रोड पर्यंत विंचरणा नदीकाठचा रस्ता असून या रस्त्याला भुतवडा व लेहनेवाडी येथील विद्यार्थीनी ये-जा करत असतात तसेच जेष्ठ नागरीक व महिला शतपावली करणेसाठी येतात. परंतू या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या महिलांना व विद्यार्थीना पाहून वात्रट बोलणे, द्वि अर्थी शब्द वापरून गलिच्छ प्रकारचे हातवारे व वर्तन करतात.
तसेच व्यसनाधिनांचे टोळके हे स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसान करतात तसेच रस्त्याच्या कडेने दारूच्या बाटल्याचा खच पडलेल्या आहे. त्यारस्त्याने कोणत्याही प्रकारची शांतता व सुव्यवस्था राहिलेली नाही. तेव्हा यांचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा भिमटोला सामाजिक संघटनेच्या वतीने बापूसाहेब गायकवाड यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
आज पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना भिमटोला सामाजिक संघटनेच्या वतीने श्री बापूसाहेब गायकवाड यांनी निवेदन दिले व आंदोलनाचा इशारा दिला, तपनेश्वर येथील अमरधाम रोड ते भुतवडा रोड पर्यंत विंचरणा नदीकाठचा रस्ता असून या रस्त्याला भुतवडा व लेहनेवाडी येथील विद्यार्थीनी ये-जा करत असतात तसेच जेष्ठ नागरीक व महिला शतपावली करणेसाठी येतात.
परंतू या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या महिलांना व विद्यार्थीना पाहून द्विअर्थ शब्द वापरून गलिच्छ प्रकारचे हातवारे व वर्तन करतात. तसेच व्यसनाधिनांचे टोळके हे स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसान करतात तसेच रस्त्याच्या कडेने दारूच्या बाटल्याचा खच पडलेल्या आहे. त्यारस्त्याने कोणत्याही प्रकारची शांतता व सुव्यवस्था राहिलेली नाही.
या रस्त्याने सायं. ६ वा. नंतर व दिवसासुद्धा महिला ये-जा करू शकत नाही. एवढी दहशत वेगवेगळ्या भागातील टवाळखोर व व्यसनाधिश रोडरोमियोंची आहे, तरी यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. असे न झाल्यास नागरीकां समवेत तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाचे दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले व जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना निवेदन देण्यात आले