सावरगाव येथील गोरे यांची दहा दिवस चाललेली मृत्यूशी झुंज अपयशी
जामखेड परिसरात या वर्षी अतिवृष्टीने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. पीके पाण्यात रस्ते उखडले, सांडवे फुटले गावांना पाण्याचा वेढा, पुल पाण्याखाली सततच्या पावसामुळे दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव उंडा येथील पारूबाई गव्हाणे या वृध्द महिलेचा भिंत अंगावर कोसळून मृत्यू झाला होता. तर दि. 22 रोजी सावरगाव येथे घर कोसळून तीघे जखमी झाले होते. यातील गौतम बाबासाहेब गोरे (वय ४०) यांची प्रकृती चिंताजनक होती. डोक्यावर व डोळ्यावर बीम पडला होता. त्यांना नगर येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. दहा दिवसांच्या उपचारानंतर अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे सावरगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
जामखेड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला होता. अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. विशेषतः नदीकाठच्या लोकांना मोठा धोका निर्माण झाला होता. पिके पाण्यात गेलेली आहेत त्यामुळे तालुक्यातील नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे. यातच सावरगाव येथे पावसामुळे एक घर पडले होतेतिघे जखमी झाले होते यातील एकाचा आज मृत्यू झाला आहे.
जामखेड तालुक्यातील सावरगाव येथे दि. २१ रोजी शनिवारी सायंकाळी गौतम बाबासाहेब गोरे हे रात्री आपल्या घरात कुटुंबासमवेत झोपलेले असताना रविवारी दि. २२ रोजी पहाटे साडेचार वाजता घर कोसळले यात स्वत: पत्नी व मुलगा तीघे जखमी झाले होते यातील गौतम गौरे यांना जास्त मार लागला होता. एक डोळा व डोक्यावर बीम कोसळला होता ते गंभीर जखमी झाले होते. दहा दिवस ते नगर येथे उपचार घेत होते. मंगळवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मोठ्या शोकाकुल वातावरणात दुपारी सावरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
गौतम बाबासाहेब गोरे (वय ४०), पत्नी सोनाली गौतम गोरे (वय ३५) व मुलगा सार्थक गौतम गोरे १४ हे घरात झोपलेले असताना पहाटे साडेचार च्या सुमारास अचानक झोपेतच अंगावर घर कोसळले यात तीघे जण जखमी झाले होते. यातील गौतम गोरे हे गंभीर जखमी झाले होते. तिघांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवले होते यातील मुलगा व पत्नी यांना किरकोळ मार लागला होता मात्र गौतम गोरे गंभीर जखमी झाले होते. दहा दिवसांच्या उपचारानंतर अखेर त्यांचा मृत्यू झाला. गोरे यांची परिस्थिती गरीब असून लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे.
तालुक्यात अतिवृष्टीने दोघांचा मृत्यू अनेक जनावरे दगावली तसेच मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली तालुक्यात नऊ जनावरे दगावली लेहनेवाडी येथील शेतकरी शरद प्रभाकर पवार यांच्या ७ शेळ्या मृत्यूमुखी भवरवाडी येथील पोपट अण्णा शिंदे यांची गायवाहून गेली तर मोहा येथील कैलास सजगणे यांची १ मेंढी ओढ्यात वाहून गेली आहे. अनेक घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांत पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
सावरगाव, घोडेगाव, खुरदैठण, मोहरी, राजुरी, शिऊर, मुंजेवाडी, वंजारवाडी, तरडगाव, वाघा यासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांची पडझड झाली तर अनेक घरात पाणी शिरले असल्याने जीवनावश्यक वस्तुंचे नुकसान झाले आहे. जवळके येथील हनुमान मंदिर पाण्यात गेले आहे. जोरदार पाऊस सुरूच आहे.
तालुक्यातील अनेक घरामध्ये पाणी शिरलेले आहे. नदीचे पाणी नदीपात्र सोडून शेतात घुसले आहे. शेती खणून गेले आहे. तर अनेक ठिकाणी लोक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत. एनडीआरएफ ची टीम खर्डा परिसरात आलेली आहे मदत कार्य सुरू आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करावेत अशी मागणी होत आहे. एक दिवस तर तालुक्यातील अठरा रस्ते पुलावर पाणी असल्याने वाहतुकीसाठी बंद होते. तसेच सिना नदीच्या पाण्याचा चौंडी गावाला विळखा पडला होता.