जामखेड करांच्या भेटीला प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी येणार नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने ओपन गरबा दांडिया

0
1312

जामखेड न्युज—–

जामखेड करांच्या भेटीला प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी येणार

नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने ओपन गरबा दांडिया

 

राजकारणाबरोबरच समाजकारणात अग्रेसर असलेले नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने शहरातील महिलांसाठी गेल्या अकरा वर्षापासून ओपन गरबा दांडिया कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे खास आकर्षण प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी असणार आहेत तर प्रमुख विशेष उपस्थिती म्हणून महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे असणार आहेत.

शुक्रवार दि. ३ आक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी व विधानसभेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या उपस्थितीत ओपन गरबा दांडिया कार्यक्रम जामखेड महाविद्यालय जामखेड येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक अमित चिंतामणी व प्रांजल चिंतामणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

जामखेड नगरपरिषदेचे कार्यकुशल नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी शारदिय नवरात्र उत्सवामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करत असताना. गेल्या अकरा वर्षापासून महिलांसाठी मोफत मोहटादेवी दर्शन घडवून आणतात तसेच दरवर्षी कोजागरी पौर्णिमा निमित्ताने महिलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. या वर्षी ओपन गरबा दांडिया कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या वतीने दरवर्षी असलेल्या शारदिय नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. हे ११ वे वर्षे असून जामखेड शहरातील महिला भगिनींसाठी नेहमीच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या कार्यक्रमाची धुरा अमित चिंतामणी यांच्या सौभाग्यवती प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी घेतली आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी देशमुख गडी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून मोहटादेवी दर्शनासाठी महिलांसोबत प्रत्थान केले होते.

जामखेड मधील महिलांसाठी ओपन गरबा दांडिया हा कार्यक्रम खास मेजवानी ठरणार आहे. एकंदरच नगरसेवक अमित चिंतामणी व प्रांजलताई चिंतामणी यांनी नवरात्र उत्सवात आयोजित केलेल्या कार्यक्रमांची एक अनोखी पर्वणीच ठरणार आहे.

महिला भगिनींनी ओपन गरबा दांडिया या
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here