जामखेड परिसरात पावसाचा हाहाकार, लेहनेवाडी येथे सात शेळ्या मेल्या, शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान
जामखेड शहरात नजिक असलेल्या लेहनेवाडी येथे मुसळधार पावसामुळे शेतकर्यांना मोठा फटका बसला असून येथील शेतकरी शरद प्रभाकर पवार यांच्या सात शेळ्या मृत्यूमुखी पडल्या आहेत यावेळी माहिती सांगताना अश्रु आणावर झाले होते. शेतकऱ्यांचे लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकताच पंचनामा झाला आहे. अतिवृष्टी मुळे तालुक्यात पिकांसह पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
रात्री पासून परिसरात सतत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. जामखेड शहरापासून जवळच असलेल्या व नगरपरिषद हद्दीत असलेल्या लेहनेवाडी येथे शरद प्रभाकर पवार यांनी वस्ती आहे तेथे जवळच शेळ्या साठी बंदिस्त कंपाऊंड केले होते. यात शेळ्या मोकळ्या होत्या. सध्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे अचानक शेळ्या होत्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी आले आणी मोठा ओढाच तयार झाला यात शेळ्या अडकल्या आणि सात शेळ्या मृत्यूमुखी पडल्या यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात मोठा ओढा तयार झाला. माती खणून गेली. आणि शेळ्या मेल्या लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसाने शेती आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाने जनजीवन विस्कळीत केले असून, शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके जमीनदोस्त झाली आहेत.
तर जनावरे पावसामुळे मृत्यू पावत आहेत. लेहनेवाडी येथेही हाच अनुभव शरद प्रभाकर पवार यांना सहन करावा लागला. त्यांच्या शेळ्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती आणखी बिकट झाली आहे.पावसामुळे शेतजमिनींवर पाणी साचले असून, इतर शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे.
तालुक्यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत पुलावरून पाणी आहे. शेती खणून गेल्या आहेत पीके पाण्यात आहेत. अनेक तलाव फुटले आहेत सांडवे खचले आहेत. पाऊस उघडण्याचे नाव घेत नाही. सध्या शेतकऱ्यांची दैनिय अवस्था झाली आहे.
जामखेड तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरू आहे. तालुक्यात सर्वच मंडळात सरासरी ओलांडली आहे. यामुळे आगोदरच ओव्हरफ्लो असलेली धरणे, नद्या, ओढे यांचे पाणी शेतात शिरलेले आहे. पीके पाण्यात आहेत तर मोठ्या प्रमाणावर रस्ते उखडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खैरी नदीला पूर आला आहे दरडवाडीचा पूल बंद आहे. तसेच आनंदवाडी चा पूल बंद आहे. यामुळे जामखेड तुळजापूर वाहतूक मार्ग बंद आहे.
बांधखडकचा पूल वाहून गेला आहे त्यामुळे संपर्क तुटला आहे. यामुळे तालुक्यातील पावसाने दैनिय अवस्था झाली आहे. नाहुली भिलारे वस्ती पुल वाहून गेला आहे. राजुरी येथून पिंपळगाव आळवा, पिंपळगावउंडा कडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी होते. जामखेड तुळजापूर रस्ता ही पाण्यात होता. शेती, पीके, पशुधन याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.