भर पावसात सरपंच सागर कोल्हे यांनी पदरमोड करत केले सांडव्याचे खोलीकरण यामुळे तलाव फुटण्याचा धोका टळला
जामखेड तालुक्यात पावसाचा हाहाकार
जामखेड तालुक्यात पावसाने हाहाकार उडाला आहे. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे. अनेक पुल वाहून गेले आहेत. दरडवाडी, आनंदवाडी पुल वाहतुकीसाठी बंद आहेत, बांधखडकचा पुल वाहुन गेला तसेच नाहुली भिलारे वस्ती येथील पुल वाहून गेल्याने वस्ती व गावाचा संपर्क तुटला आहे. पीके पाण्यात आहेत. रस्ते खचले आहेत. तालुक्यातील राजुरी येथील तलावही फुटण्याच्या मार्गावर असताना सरपंच सागर कोल्हे यांनी भर पावसात पदरमोड करत जेसीबीच्या सहाय्याने सांडवा खोलीकरण केले यामुळे तलाव फुटण्याचा धोका टळला आहे.
जामखेड तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाचा हाहाकार सुरू आहे. तालुक्यात सर्वच मंडळात सरासरी ओलांडली आहे. यामुळे आगोदरच ओव्हरफ्लो असलेली धरणे, नद्या, ओढे यांचे पाणी शेतात शिरलेले आहे. पीके पाण्यात आहेत तर मोठ्या प्रमाणावर रस्ते उखडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खैरी नदीला पूर आला आहे दरडवाडीचा पूल बंद आहे. तसेच आनंदवाडी चा पूल बंद आहे. यामुळे जामखेड तुळजापूर वाहतूक मार्ग बंद आहे.
बांधखडकचा पूल वाहून गेला आहे त्यामुळे संपर्क तुटला आहे. यामुळे तालुक्यातील पावसाने दैनिय अवस्था झाली आहे. नाहुली भिलारे वस्ती पुल वाहून गेला आहे. राजुरी येथून पिंपळगाव आळवा, उंडा कडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी होते. जामखेड तुळजापूर रस्ता ही पाण्यात होता तसेच तलाव फुटण्याचा धोका लक्षात घेऊन सरपंच सागर कोल्हे यांनी भर पावसात उभे राहून स्वतः च्या जेसीबीच्या सहाय्याने सांडवा खोलीकरण केले. यामुळे तलाव फुटण्याचा धोका टळला.
मागील आठवड्यात अतिवृष्टीने हाहाकार उडाला होता. परत रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाला यामुळे अनेक ठिकाणी पुलावरून पाणी आहे वाहतूक बंद आहे. सातही मंडळात सरासरी शंभर टक्के पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कांदा लागवड नुकतीच केलेल्या कांदा पीकात तळे साचले आहे. तर सोयाबीन पीके काढणीस आलेली आहेत मात्र आता ती पाण्यात आहेत. दररोजच पाऊस येत आहे. कधी पाऊस उघडणार पाणी कधी ओसरणार यात मोठ्या प्रमाणावर पीके पाण्यात सडून जाणार आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
तालुक्यातील अनेक पुलावरून पाणी गेल्याने पुल खचले आहेत. रस्ते उखडले आहेत. वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोहरी तलावाचा सांडवा फुटला होता. तसेच आनंदवाडी, दरडवाडी पुल वाहतुकीसाठी बंद आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरे कोसळून नागरिक जखमी झाले आहेत. तर पशूधनही मोठ्या प्रमाणात वाया गेले आहे.
पीके पाण्यात गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाऊस दररोजच येत आहे. शेतातील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे. शेते खणून गेले आहेत. पीके पाण्यात शेतात तळे यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
चौकट सध्या अनेक ओढे, नदी यांनी पात्र सोडून बाहेर येत आहे यास आपणच जबाबदार आहोत. कारण प्रत्येक ठिकाणी नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झालेली आहेत नदी पात्र लहान झाले आहेत. तसेच नदी पात्रात झाडे झुडपे तसेच पाण्याला अडथळा होईल अनेक अडथळे आहेत. टाकाऊ वस्तू व फाटके निरूपयोगी कपडे नदीत टाकले जातात. यामुळे पाणी पात्रात पाणी बसत नाही. नदी, ओढे यातील अतिक्रमण हटाव मोहीम राबविणे आवश्यक आहे.