रयतचे विद्यार्थी आर्टिफिशिंयल इन्टीलीजन्स (A. I) शिकू लागले -चेअरमन चंद्रकांत दळवी
बदलत्या काळानुसार रयत शिक्षण संस्थाही बदलत आहे.
नागेश विद्यालयातील जागेचा नकाशा संदर्भातील प्रश्न तात्काळ सोडवून दिला व नवीन इमारत बांधकाम करण्याच्या तयारीला लागा असे मुख्याध्यापक व समस्थ ग्रामस्थ यांना सूचना दिल्या, त्याच बरोबर संस्थेमध्ये चालू असलेल्या A. I प्रकल्प काळाची गरज त्यानुसार के आय टी सातारा येथील Center Of Excellence ची उभारणी आणि उद्देश या बद्दल मार्गदर्शन केले. आधुनिक काळासोबत रयत शिक्षण संस्था बदलत आहे असे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी सांगितले.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक ,थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील (डि.लीट) यांची जयंती सोहळा जामखेड मध्ये उत्साहात संपन्न झाला जामखेड रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय ,ज्युनिअर कॉलेज, कन्या विद्यालय जामखेड यांचे संयुक्त विद्यमाने कर्मवीर जयंती अतिशय उत्साहात संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी IAS(Retd)व अध्यक्ष हरिभाऊ बेलेकर प्रमुख उपस्थिती विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी व प्रमोद तोरणे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य विनायक राऊत, मधुकर आबा राळेभात, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, विजयसिंह गोलेकर, अमोल बहिर, अशोक यादव, डॉ सागर शिंदे ,कुंडल राळेभात, गुलाब जांभळे, सुनील उगले, वैजनाथ पोले, राम निकम, प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापिका भोर आर आर, नाळे एस के,जाधवर एस व्ही संजय हजारे जामखेड कर्जत बीड मधील सर्व रयत शाखेचे मुख्याध्यापक व सेवक उपस्थित होते.
डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.१७ महा बटालियन एनसीसीचे नागेश युनिटने मान्यवरांना एनसीसी कॅडेट द्वारे सलामी देऊन लेझीम झांज ढोल पथका द्वारे स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी ए आय चे माध्यमातून केलेले उपकरने व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
प्राचार्य मडके बी के यांनी आपल्या प्रस्ताविकातून विद्यालयामध्ये चालू असलेले विविध उपक्रम व विविध स्पर्धा परीक्षेत यश याबद्दल माहिती देऊन प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी साहेब यांच्या कार्याचा परिचय करून दिला. खैरे संचित व तेजश्री सांगळे या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले. देणगीदार डॉ सागर शिंदे व काकासाहेब नेटके यांचा सन्मान करण्यात आला.
स्कुल कमिटी सदस्य विनायक राऊत ,मधुकर (आबा)राळेभात यांनी आपल्या भाषणातून अण्णाचे विचार आजही किती प्रेरणादायी आहेत ते सांगितले.
उत्तर विभागाचे विभागीय नवनाथ बोडखे यांनी आदरणीय चेअरमन चंद्रकांत दळवी साहेब यांची कार्यप्रणाली आणि झिरो पेंडन्सी सर्वांना अवगत करून दिली. कर्मवीर व लक्ष्मी वहिनी यांचे जीवनातील विविध प्रसंग सांगितले.
प्रमुख पाहुणे चेअरमन चंद्रकांत दळवी म्हणाले की, आर्टिफिशिंयल इन्टीलीजन्स (A. I)-संस्थेत विद्यार्थी शिकू लागले आहेत व त्याचा उपयोग करत आहेत., भविष्यात पुढे जाण्यासाठी आपण अपडेट आणि समृद्ध झालं पाहिजे असे सांगितले.SWOT analysis कस करावं म्हणजे आपली ध्येय निशिती होईल या विषयी मार्गदर्शन केले. कर्मवीरांच्या विविध पैलूंचे मार्गदर्शन केले. व आमदार रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून नागेश विद्यालयात सांस्कृतिक सभागृह उभारण्यात येणार आहे याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कुल कमिटी सदस्य श्री हरिभाऊ बेलेकर यांनी सांगितले की कर्मवीर अण्णांचा आदर्श घेऊन आपण जीवन जगलं पाहिजे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका श्रीम भोर आर आर, सूत्रसंचालन इंगळे एस एम व बडे सर यांनी केले. कार्यक्रम नियोजन नागेश व कन्या विद्यालय सर्व टीम ने यशस्वी केले.