जामखेड शहरातील रस्ते म्हणजे असून अडचण नसून खोळंबा रस्त्यावरील मातीच्या ढिगाऱ्यामुळे घसरून अपघात जखमीला सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केले दवाखान्यात दाखल
रस्त्यावरील मातीच्या ढिगाऱ्यामुळे घसरून अपघातजखमीला सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केले दवाखान्यात दाखल
जामखेड शहरातील खर्डा रोडवरील काझी प्लाझा समोर रस्त्यावर चिकन मातीच्या चिखलामुळे झालेल्या मोठा अपघात घडला. रस्त्या च्या बाजूला पडलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे प्रचंड चिखल साचला आणि तो घसरट झाल्याने नागरिकांचे हाल होत असून बरेच जण त्या चिखलामुळे घसरून पडले आहेत. परिणामी तब्बल ५० ते ६० नागरिक गंभीर जखमी झाले. अनेकांना हात, पाय व डोक्याला दुखापती झाल्या असून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दुर्घटनेची माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी फोनवरून हजारो लोकांचे प्राण वाचवणारे समाजसेवक संजय काका कोठारी यांना दिली. बातमी समजताच कोठारी यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी आपले मित्र धनंजय भोसले यांच्या समवेत रुग्णवाहिका घेऊन धाव घेतली.
त्यांनी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली जखमी नागरिकांना उचलून त्वरित ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे दाखल केले. त्यांच्या या तातडीच्या धावपळीमुळे जखमीचे जीव वाचले.
सध्या चारी बाजूला रोड खराब असल्यामुळे शहरातली रोड खराब असल्यामुळे रोज एक तरी जबर अपघात होत आहे यास जबाबदार अधिकाऱ्यांनी ताबडतोब लक्ष घालावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केली.
घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती, लोकांमध्ये भीती व संभ्रम पसरला होता; पण संजय काका कोठारींच्या धीर देणाऱ्या उपस्थितीमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. त्यांनी केवळ मदतच केली नाही तर जखमींच्या नातेवाईकांना धीरही दिला.
या प्रकरणाची माहिती पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना देण्यात आली असून त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे. अपघात का व कसा घडला याची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई होणार असल्याचे समजले
दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, “रस्त्यांची योग्य देखभाल न झाल्यामुळे हा प्रकार घडला. प्रशासनाने त्वरित खबरदारी घ्यावी व नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबवावा,” अशी मागणी होत आहे.
तसेच संबंधित पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांना कोठारी यांनी फोनवर माहिती दिली असून शुक्रवार दिनांक रोजी सकाळी ताबडतोब रोड चे खड्डे बुजून सुरळीत करून रोलर फिरवून देतो असे सांगितले यावेळी सागर गुंदेचा आणि महेश सोनवणे यांनी मदत केली