पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त जामखेड भाजपाच्या वतीने सेवा उपक्रम
भव्य रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, पशुवैद्यकीय आरोग्य शिबीर, दिव्यांग व्यक्ती सन्मान शिबीर, नमो मॅरेथॉन सह विविध उपक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बुधवार दिनांक 17सप्टेंबर रोजी जामखेड भाजपाच्या वतीने वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त भाजपाच्या वतीने सेवा उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन भाजपा शहरमंडलाध्यक्ष संजय काशीद यांनी केले आहे.
हिंदुस्तानचे कणखर नेतृत्व, देशाचे लाडके पंतप्रधाननरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण सर्वांनी या समाजोपयोगी उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करून समाजासाठी एक अमूल्य योगदान द्यावे, ही मनःपूर्वक विनंती भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.
आपल्या एका थेंब रक्तातून एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात नवा प्रकाश व नवसंजीवनी फुलणार आहे. बुधवार दि. 17 रोजी भाजपा कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वच्छता अभियान गुरूवार दि. 18 रोजी नागेश्वर मंदिर परिसर तसेच सिध्दार्थ नगर परिसरात स्वच्छता अभियान शुक्रवार दि. 19 रोजी तपनेश्वर येथील महादेव मंदिर, नदीकिनारी तपनेश्वर गल्ली येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
आरोग्य शिबीर शनिवार दि. 20 रोजी सकाळी 9 वाजता तपनेश्वर गल्ली ढवळे किराणा स्टोअर्स येथेतसेच पशुवैद्यकीय आरोग्य शिबीर रविवार दि. 21रोजी धोत्री, लेहनेवाडी, भुतवडा, जमादारवाडी, चुंभळी, जांबवाडी,, बटेवाडी येथे राबविण्यात येणार आहे. दिव्यांगव्यक्ती सन्मान सोमवार दि 22 रोजी भाजपा कार्यालयात दिव्यांग व्यक्तीचा सन्मान करण्यात येणार आहे.
आरोग्य शिबीर मंगळवार दि 23 रोजी भाजपा कार्यालय तसेच पंडित दीनदयाळ जयंती व वृक्षारोपण आणि ओकल फाँर लोकल स्वदेशी नारागुरूवार दि. 25 रोजी बीड रोड तसेच पोलीस स्टेशन परिसरात
नमो मॅरेथॉन रविवार दि. 28 रोजी खर्डा चौक चौफुला रोडवर
लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी जयंती गुरूवार दि. 2 आक्टोबर रोजी भाजपा कार्यालयात साजरी करण्यात येणार आहे.