Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुलाची दुरावस्था, नागरिकांचे हाल, पुलाच्या दुरूस्तीसाठी आकाश बाफनाचा पुढाकार ...

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुलाची दुरावस्था, नागरिकांचे हाल, पुलाच्या दुरूस्तीसाठी आकाश बाफनाचा पुढाकार प्रशासन झोपेत, आकाश बाफना मैदानात, नागरिकांसाठी उचलली दुरुस्ती जबाबदारी

0
523

जामखेड न्युज—–

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुलाची दुरावस्था, नागरिकांचे हाल, पुलाच्या दुरूस्तीसाठी आकाश बाफनाचा पुढाकार

प्रशासन झोपेत, आकाश बाफना मैदानात, नागरिकांसाठी उचलली दुरुस्ती जबाबदारी

 

शहरातील मोरे वस्ती येथील पुलाची अनेक वर्षांपासून दुरावस्था आहे. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते ही बाब काही स्थानिक नागरिकांनी प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते आकाश बाफना यांच्या कानावर घातली तेव्हा बाफना यांनी प्रत्यक्षात पाहणी करत प्रशासनाच्या आदेशाची वाट न पाहता पुलाच्या दुरूस्तीची जबाबदारी उचलली.

पुलाच्या दुरूस्तीची आकाश बाफना यांचे नागरिकांनी आभार मानले आहेत. असेच सामाजिक कार्ये बाफना यांच्या हातातून होवो अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

जामखेड नगरपरिषद क्षेत्रातील वार्ड क्र. २ व ३ मधील मोरे वस्ती परिसरातील पुलाची अवस्था अत्यंत जीर्ण झाली असून नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्यात या पुलावरून दररोज शालेय विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने प्रवास करतात.

पुलाच्या दोन्ही बाजूंना भेगा पडून लोखंडी सळई बाहेर आल्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या धोकादायक परिस्थितीकडे प्रशासनाने अद्याप लक्ष दिले नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांनी नागरिकांच्या मागणीवर प्रत्यक्ष जाऊन पुलाची पाहणी केली.या पुलाचे काम प्रशासनाच्या अपेक्षेवर न ठेवता मी स्वतःच्या स्वखर्चातून पूर्ण करून देणार कारण हा प्रश्न थेट नागरिकांच्या जीविताशी संबंधित आहे. असे यावेळी बोलताना आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना म्हणाले.

यावेळी येथील नागरिक पांडुरंग माने,उमेश राळेभात, नितीन राऊत, प्रशांत जगदाळे तसेच शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार डोंगरे आदी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!