साकत ग्रामस्थांच्या वतीने भाकरी, ठेचा, लोणचं फळे बिस्किटे मुंबई कडे रवाना
मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु करण्यात आले आहे. त्या ठिकाणी आंदोलकांच्या जेवणाची गैरसोय होऊ लागल्यानेराज्यभरातील गावागावातून हजारो भाकरी, ठेचा, लोणचं व इतर खाद्य पदार्थ मुंबईकडे रवाना केले जात आहेत. यात साकत, कोल्हेवाडी, पिंपळवाडी, कडभनवाडी तसेच अनेक गावांमधून भाकरी, ठेचा, लोणचं फळे बिस्किटे मुंबई कडे रवाना करण्यात आले आहे. गावात दवंडी देतात गावातील नागरिकांनी विठ्ठल मंदिरात भाकरी, ठेचा, लोणचं, फरसाण, बिस्किटे, फळे याचा ओघ सुरू झाला. आणी एकत्रित करत पँकिंग करून पिकअप मुंबई च्या दिशेने रवाना झाले. यावेळी गावातील अनेक कार्यकर्ते, नेते मंडळी उपस्थित होते.
राज्यभरातून कोट्यवधी युवक मराठा आरक्षण प्रश्नावर मुंबईत सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आता २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषण आंदोलन सुरु करण्यात आले असून त्या परिसरातील खाद्यपदार्थाचे हॉटेल्स बंद असल्याने आंदोलकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. यावर आता गावागावातील मराठा समाज बांधवांनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे.
शनिवारी आणि रविवारी दोन दिवसात जामखेड तालुक्यातील अनेक गावांमधून हजारो भाकरी, लोणचं, ठेसा यासह विविध खाद्यपदार्थ मुंबईकडे रवाना करण्यात आले आहेत. याकरिता महिलांनी पुढाकार घेतला असून गावात दवंडी दिल्यानंतर घराघरात भाकरी केल्या जातात.
त्याबरोबरच चटणी, ठेसा आणि इतर खाद्यपदार्थ गावात एकत्र केले जातात. दहा-वीस गावामधून असे खाद्यपदार्थ एकत्र केल्यानंतर पीकअप अथवा मिळेल त्या वाहनाने मुंबईकडे पाठवले जात आहे. थेट आंदोलनात सहभागी नसलेले, गावाकडे थांबलेले मराठा बांधव याकरिता प्रयत्न करतांना दिसत आहेत.
तसेच आणखी कितीही दिवस थांबावे लागले तरी काळजी करु नका, आम्ही शिदोरी पोहच करु अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. गावागावात दवंडी देवून भाकरी तयार करण्याचे आवाहन केले जात आहे. यामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची असून घरोघरी भाकरी करण्याचे काम महिला करत आहेत. याबरोबरच चटणी, ठेसा व इतर काही दिवस टिकू शकतील अशा पदार्थांची शिदोरी एकत्र केली जात आहे. गावाकडे थांबलेल्या मराठा बांधवांच्या या तत्परतेमुळे मुंबईतील आंदोलकांना मोठा आधार मिळू लागला आहे.
मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उपोषण स्थळी टेम्पो च्या टेम्पो भाकरी, चटणी, लोणचे, तेल, पापड आदींची शिदोरी मुंबईला पोहोच करण्यात येत आहे.