श्री साकेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कोल्हेवाडी बस सुरू, ग्रामस्थ, विद्यालयाच्या वतीने चालक वाहकांचा सत्कार
श्री साकेश्वर विद्यालय साकत येथे, पिंपळवाडी, कोल्हेवाडी, शिवनगर, हानुमानवस्ती कडभनवाडी, वराट वस्ती येथील विद्यार्थी – विद्यार्थीनी येतात, पिंपळवाडी कडभनवाडी येथे बस सेवा सुरू होती. या वर्षी कोल्हेवाडी येथील अनेक विद्यार्थ्यांनी विद्यालयात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे कोल्हेवाडी बस सुरू करण्याची मागणी विद्यालय व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आली होती. या प्रयत्नाला आज यश आले आहे. आज गावाला प्रथमच बस सुरू झाली.
बस सुरू करण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख ( उबाठा) राजेंद्र दळवी, भाजपा शहराध्यक्ष शहर मंडळ संजय काशिद, राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग माने, उपसरपंच राजाभाऊ वराट, पोलीस पाटील महादेव वराट, विद्यालयातील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, पत्रकार अविनाश बोधले, पप्पू भाई सय्यद, यांनी प्रयत्न केले. या प्रयत्नाला आज यश मिळाले आणि बस सुरू झाली.
आज कोल्हेवाडी, शिवनगर येथे बसचे स्वागत करताना चालक वाघीरे, तर वाहक दिगंबर अंदुरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपसरपंच राजाभाऊ वराट, पोलीस पाटील महादेव वराट, ज्ञानदेव मुरूमकर, अभिषेक पाटील,मुख्याध्यापक दत्ता काळे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, सचिन वराट, प्रसाद होशिंग, अतुल दळवी, बाळासाहेब सानप, विलास कोल्हे, वाल्मिक कोल्हे, साहेबराव कोल्हे, बाळासाहेब यादव, शिवाजी कोल्हे, सागर कोल्हे, वाल्मिक कोल्हे, डॉ. किरण कोल्हे, लक्ष्मण कोल्हे, जयदिप कोल्हे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोल्हेवाडी साठी बस सुरू झाल्याने विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला मोठ्या उत्साहात बसचे स्वागत केले. कारण गावात प्रथमच बस येत होती.
गावाने फक्त निवडणूकीच्या वेळी मतदान पेटी घेऊन आलेली बस पाहिली होती. आता विद्यार्थ्यांसाठी दररोज बस येणार आहे. यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थ आनंदात होते.