एस टी बसेसवर ‘पुण्यश्लोक’ नाव टाकावे – पांडुरंग माने
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक आदर्श शासक, न्यायदात्या आणि समाजसुधारक होत्या, ज्यांनी भारतभर अनेक मंदिरांचे बांधकाम व जीर्णोद्धार केले आणि लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी धोरणे आखली. त्यामुळे त्यांचे कार्य व योगदान लक्षात घेऊन एस टी वर पुण्यश्लोक नाव टाकावे अशी मागणी पांडुरंग माने विभाग प्रमुख (NCP -SP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा यांनी निवेदनाद्वारे आगार प्रमुख राजेंद्र जगताप यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथील आहे त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जामखेड बस आगारातील एस टी बसेस वर पुण्यश्लोक असे नाव टाकावे अशी मागणी करण्यात आली आहे.
जेव्हा हिंदुस्तान परकिय राजवटीमुळे शंत खंडित झाला होता. त्यास अखंडित ठेवण्याचा काम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले.
या खंडप्राय देशाच्या प्रत्येक भौगोलिक स्थानावर त्यांनी अनेक मंदिरांची निर्मिती केली व शेकडो मंदिरे जनार्धन जीनौद्रधार केला व हिंदू संस्कृतीला पुनर्जीवित करत भारत भूमीला आत्मसन्मान मिळवून दिला.
अशा या महान प्रेरणादायी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी महान कार्य केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण हिंदुस्थानला नवी दिशा दिली. देशाला अखंडित ठेवले यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नाव टाकावे.
अहिल्यानगर परिवहन विभाग नियंत्रक (डि.सी.साहेब अहिल्यानगर) यांना निवेदन देऊन समस्त जामखेडकर याच्या वतीन मागणी करणात आहे.डि.सी.साहेब अहिल्यानगर आपण लवकरच या विषयाची दखल घेत विषयाकडे दुर्लक्ष न करता मागणीनुसार नामकरण करण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
जिल्हा आगार प्रमुख राजेंद्र जगताप यांना निवेदन देताना पांडुरंग माने सदस्य महाराजा यशवंतराव होळकर राज्यभिषेक सोहळा समिती महाराष्ट्र राज्य. तसेच विभाग प्रमुख (NCP-SP) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा तसेच नितीन राऊत जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार VJNT अहिल्यानगर हे उपस्थित होते.