मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जामखेड तालुका सज्ज
तालुक्यातून जाणार हजारो मराठा बांधव
मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मोठ्या निर्धाराने ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे. याच अनुषंगाने आज अखंड मराठा समाज, जामखेडच्या वतीने आज दुसर्यांदा जामखेड शहरात नियोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीत मंबई येथे होणार्या मनोज जरांगे पाटिल यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जामखेड तालुक्यातुन हजारो मराठा बांधव सहभागी होणार आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. २९ ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या विशाल मोर्चा व उपोषणाच्या पार्श्वभूमीवर जामखेडमध्ये यापूर्वी गुरुवार दि.२१ ऑगस्ट रोजी एक बैठक संपन्न झाली होती. यानंतर पुढील नियोजन करण्यासाठी पुन्हा दुसर्यांदा आज रविवार दि २४ ऑगस्ट २०२५ रोजी अखंड मराठा समाज्याच्या वतीने बैठक संपन्न झाली.
या बैठकीत अनेक मराठा बांधवांनी काही सुचना मांडल्या. त्या अनुषंगाने मंबई येथे आंदोलनात सहभागी होण्यासाठी तालुक्यातील गावागावात मराठा समन्वय बैठका घेणार आहेत. तसेच जास्तीत जास्त मराठा बांधवांनी मंबई येथे जाण्यासाठी वाहनांचे नियोजन करायचे आहे.
तसेच जाण्यासाठी वहाने कशी उपलब्ध करता येतील यावर देखील चर्चा झाली. मराठा सेवक प्रत्येक गावात बैठका घेऊन वाहनांचे नियोजन करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी मंबई येथे जे बांधव जाणार आहेत त्यांना वहाने, जेवण व पाणी कशा पद्धतीने उपलब्ध करता येईल यावर देखील चर्चा झाली.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मंबईकडे रवाना होण्यासाठी दि २७ रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी येथून निघणार आहेत. दुपारी ते अहिल्यानगर याठिकाणी येणार आहेत. याच आनुशंगाने दि २७ ऑगस्ट रोजी जामखेड शहरातील जुन्या तहसील कार्यालयासमोर देखील हजारो मराठा बांधव मंबई याठिकाणी जाण्यासाठी जमा होणार आहेत.
यानंतर सायंकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या आहील्यानगर येथिल ताफ्यात जामखेड येथुन वाहनाने आलेले मराठा बांधव सामिल होणार आहेत. बैठकी दरम्यान जामखेड तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, मराठा बांधव, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, डॉक्टर, शिक्षक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.