अरणेश्वर यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न सरपंच अँड. संजय पारे व ग्रामपंचायत च्या वतीने भाविकांना सेवा उपलब्ध पारे कुटुंबियांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त जि. प. शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप
सरपंच अँड. संजय पारे व ग्रामपंचायत च्या वतीने भाविकांना सेवा उपलब्ध
पारे कुटुंबियांच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त जि. प. शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप
जामखेड तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून अरणगाव येथील अरणेश्वर देवस्थान ओळखले जाते. येथील यात्रा उत्सव, लोटांगण व भंडारा उत्सवमोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच अँड संजय पारे यांनी भाविक भक्तांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या यामुळे यात्रा उत्सव व सप्ताह, लोटांगण व भंडारामोठ्या उत्साहात संपन्न झाला. तसेच स्वातंत्र्य दिनानिमित्त अरणगाव व पारेवाडी जिल्हा परिषद शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
अरणगाव ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच अँड संजय पारे यांनी संपुर्ण परिसरात यात्रेनिमित्त स्वच्छता मोहीम राबवली तसेच विजेच्या सोईसाठी हाय मास्ट लॅम्प बसविले. भाविक भक्तांसाठी औषध, पाणी उपलब्ध करून देण्यात आले होते.या काळात पोलीस प्रशासनाचेही चांगले सहकार्य लाभले.
4 आँगस्ट ते 11 आँगस्ट यात्रेनिमित्त सप्ताह, लोटांगण व भंडारा उत्सवाचेआयोजन करण्यात आले होते. यासाठी सरपंच अँड संजय पारे तसेच भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष संगिता पारे यांनी संपुर्ण सप्ताह काळात प्रत्येक कार्यक्रमात हिरिरीने सहभाग नोंदवला यात भजन, भंडारा, लोटांगण सोहळा याच बरोबर विविध धार्मिक कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले होते.
सप्ताह निमित्त रणजित बाप्पू महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच परिसरात येणाऱ्या वीस ते पंचवीस दिंड्यांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यासाठी सरपंच अँड संजय पारे व भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष संगिता पारे, अमोलशेठ शिंदे, माजी सरपंच अंकुश शिंदेयांनी अकरा दिवस सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून सेवा सुविधांचा आढावा घेतला.
यात्रा उत्सव व सप्ताह साठी विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, तसेच यांच्या मातोश्री भामाबाई शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, अशोक खेडकर, खर्ड्याच्या सरपंच संजिवनी पाटील, संध्या सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदकुमार गोरे, अजय काशिद, माजी सभापती डॉ भगवानराव मुरूमकरयांच्या सह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
चौकट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सरपंच अँड संजय पारे व भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्ष संगिता पारे यांच्या वतीने अरणगाव व पारेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.