बेलेकर कुटुंबियांनी नेहमीच जामखेड करांच्या भल्याचा विचार केला – नामदेव राऊत
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अजिंक्यतारा पेट्रोलियम भव्य शुभारंभ संपन्न
जामखेड शहरातील बेलेकर कुटुंबियांनी नेहमीच जामखेड च्या भल्याचा विचार केला. आता पेट्रोल पंप च्या व्यवसायात पदार्पण केले आहे. यातही ते ग्राहकांना चांगली सेवा देऊन आपला नावलौकिक करणार आहेत असे मत कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी मत व्यक्त केले.
हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अजिंक्यतारा पेट्रोलियमचा शुभारंभ हभप विजयकुमार बागडे महाराज, हभप ज्ञानेश्वर पवळे महाराज सह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळीमच्छिंद्र पाडळे तहसीलदार जामखेड, हरीभाऊ बेलेकर ज्ञानेश्वर कोळी, रामकिसन कोळी संजय बेलेकर, ईश्वर कोळी साहिल बेलेकर, विनोद बेलेकर, पवन बेलेकर, वैभव कोळी, अवधूत बेलेकर, प्रा. मधुकर राळेभात, भाजपा मंडळ शहराध्यक्ष संजय काशिद, उद्धवराव देशमुख, दिलीप शेठ बाफना, आकाश बाफना, नामदेव राऊत, संतोष म्हेत्रे, प्राचार्य बी. ए. पारखे, जयसिंगराव भैसडे, कृषी अधिकारी अमोल बहिर, माजी प्राचार्य रमेश अडसूळ, दत्तात्रय राजमाने, प्रा.युवराज भोसले, प्रदिप टाफरे,कांतीलाल राजगुरू, काकासाहेब गर्जे, राजुरीचे सरपंच सागर कोल्हे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती कैलास वराट, महादेव डुचे, प्रा. श्रीराम चौभारे, किसनराव ढवळे, गणेश कोल्हे, विजय हराळे, भरत लहाने, दिपक सुरवसे, दत्ता मोरे, सुभाष कापसे, नामदेव कापसे, गोरख कापसे, तुकाराम विधाते, रामभाऊ राऊत, अकुंश साहेब, अनिल देडे, विजय हराळे, विनायक जोशी, अंकुश उगले, गहिनीनाथ बोराटे, महेश नगरे, शंकरराव नेवसे, बंडू कारंडे, विकास मोराळे, सतिश भोगे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना हभप विजयकुमार बागडे महाराज म्हणाले की, अजिंक्यतारा पेट्रोलियमचा शुभारंभ त्रिवेणी मुहूर्तावर होत आहे. स्वातंत्र्य दिन, कृष्ण जन्म, संत ज्ञानेश्वर महाराज जन्मास साडेसातशे वर्षे असा त्रिवेणी मुहूर्त आहे. यामुळे या व्यवसायायाची भरभराट निश्चितच होणार आहे.
यावेळी बोलताना प्रा. मधुकर राळेभात म्हणाले की, अजिंक्यतारा पेट्रोलियमच च्या रूपाने जामखेड शहराचे वैभव वाढले आहे. जामखेड च्या जडणघडणीत बेलेकर कुटुंबाचे योगदान खुप मोठे आहे. व्यापार वाढीसाठी प्रयत्न करणारे बेलेकर घराणे यांचे योगदान वाखाणण्याजोगे आहे. या पेट्रोलियमच्या अनेक शाखा होत राहो अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी आकाश बाफना म्हणाले की, एकदा ठरवले की बेलेकर कुटुंब ते पुर्णच करणार आता पेट्रोल पंप व्यवसायात ग्राहकांना चांगली सेवा देत नावलौकिक करतील
यावेळी बोलताना नेवसे पाटील म्हणाले की, सध्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे ग्राहकांना चांगली सेवा द्या निश्चित आपली भरभराट होणार आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी बेलेकर व कोळी कुटुंबियांनी सर्वांचे आभार मानले.