स्व. एम. ई. भोरे ज्युनियर कॉलेजमध्ये झाडांना राखी बांधत निसर्गरक्षणाचा आगळावेगळा उत्सव
जामखेड तालुक्यातील पाडळी येथील सनराईज मेडिकल & एज्युकेशन फौंडेशन चे स्व.एम. ई.भोरे ज्युनिअर कॉलेज येथे रक्षाबंधन उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
पारंपरिक पद्धतीने भाऊ–बहिणींमध्ये राखी बांधण्याऐवजी, विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबवत झाडांना राखी बांधून त्यांचे रक्षण करण्याचा संकल्प केला.या उपक्रमात मुली व मुलांनी हिरवळीत असलेल्या वृक्षांना रंगीबेरंगी राख्या बांधल्या “या झाडांचे आयुष्यभर रक्षण करू” अशी शपथ घेतली.
शिक्षक व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व, पर्यावरण संरक्षणाची गरज निसर्गाशी आपले नाते अधिक दृढ करण्याचे संदेश दिले.या वेळी विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनावर आधारित घोषवाक्ये, कविता लघुनाटिका सादर केल्या.रक्षाबंधनाचा हा आगळावेगळा साजरा पाहून उपस्थित सर्वांचे मन प्रसन्न झाले.
अशा उपक्रमांमुळे केवळ सण साजरे होत नाहीत, तर पर्यावरणाची काळजी घेण्याची जाणीवसमाजात रुजते, असा सूर उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
यावेळी सनराईज शैक्षणिक संकुलाच्या सचिव तथा साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय, स्व.एम.ई भोरे जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ. अस्मिता जोगदंड (भोरे) , संचालक प्रा. तेजस दादा भोरे प्रा.विनोद बहिर, प्रा. सौ. स्वाती पवार मॅडम, प्रा.प्रदीप भोंडवे, प्रा. दादासाहेब मोहिते, प्रा. छबिलाल गावित,प्रा. विवेक सातपुते, प्रा. सुनील घाडगे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.